Organic Farm : कृषी विद्यापीठात आता सेंद्रिय सर्टिफिकेट अभ्यासक्रम, जनजागृती अन् रोजगाराची संधीही

कृषी विद्यापीठातून सेंद्रिय सर्टिफिकेट हा पहिल्यांदाच उपक्रम राबवला जात आहे. सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेण्याचे महत्व आणि त्यासंबंधीचे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासंदर्भात यामध्ये मार्गदर्शन होणार आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात शासकीय स्तरावरुन अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. मूळ फ्रान्समधील असेलेली 'इकोसर्ट' ही आंतरराष्ट्रीय संस्था व पंदेकृविने एकत्रितपणे हा अभ्यासक्रम तयार केला असून या अभ्यासक्रमाच्या आधारावर सेंद्रिय शेतीचे धड गिरवले जाणार आहेत.

Organic Farm : कृषी विद्यापीठात आता सेंद्रिय सर्टिफिकेट अभ्यासक्रम, जनजागृती अन् रोजगाराची संधीही
सेंद्रीय शेती
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 3:35 PM

अकोला : गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या माध्यमातून (Organic Farm) सेंद्रिय शेतीचे महत्व निदर्शनास आणून दिले जात आहे. (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून तर अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. शिवाय आता सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले अन्नधान्य आणि भाजीपाल्याला अधिकची मागणी आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे भवितव्य पाहता आता सेंद्रिय शेतीचा अभ्यास केलेल्या (Agree Student) विद्यार्थ्यांना सेंद्रिय सर्टिफिकेट दिले जाणार आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यंदाच्या वर्षापासून हे सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या अभ्यासक्रमात तर बदल होईलच पण विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर त्याचे व्यवसायाचेही धडे मिळणार आहेत.

अभ्यासक्रम काय असणार?

कृषी विद्यापीठातून सेंद्रिय सर्टिफिकेट हा पहिल्यांदाच उपक्रम राबवला जात आहे. सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेण्याचे महत्व आणि त्यासंबंधीचे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासंदर्भात यामध्ये मार्गदर्शन होणार आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात शासकीय स्तरावरुन अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. मूळ फ्रान्समधील असेलेली ‘इकोसर्ट’ ही आंतरराष्ट्रीय संस्था व पंदेकृविने एकत्रितपणे हा अभ्यासक्रम तयार केला असून या अभ्यासक्रमाच्या आधारावर सेंद्रिय शेतीचे धड गिरवले जाणार आहेत.

काळाच्या ओघात सेंद्रिय शेतीचे वाढते महत्व

बदलत्या काळाच्या ओघाच निरोगी आरोग्यासाठी पुन्हा सेंद्रिय अन्नधान्य व उत्पादनांच्या मागणीत वाढ होत आहे. अधिकच्या मागणीमुळे दरही चांगला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सेंद्रिय शेती पध्दतीच्या क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारही प्रयत्न करीत आहे. या सर्वांचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या दृष्टीने हा कोर्स फायदेशीर ठरणार आहे. असे असले तरी सेंद्रिय पीक आहे की नाही यासाठी काही मापदंड ठरवून दिले आहेत. ते पूर्ण करण्यासाठीच या सर्टिफिकेट कोर्सचा उपयोग होणार आहे.

हे सुद्धा वाचा

यंदाच्या वर्षापासूनच अभिनव उपक्रम

सध्याही काही संस्थांकडून हा सर्टिफिकेट कोर्स करुन दिले जात आहेत. यामध्ये ‘इकोसर्ट’ ही एक महत्वाची संस्था आहे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, सेंद्रिय शेतीचे महत्व आणि गरज ओळखून विद्यापीठाअंतर्गत हा सर्टिफिकेट कोर्स सुरु केला जाणार आहे. कृषी विद्यापीठातील तज्ञ हे मार्गदर्शन करणार आहेत. ऑगस्टपासून या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरवात होणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी सांगितले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.