Mango : निसर्गाच्या लहरीपणानंतर आता आंबा दरात घसरण, शेवटी नुकसान ते नुकसानच..!

हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. हे कमी म्हणून की काय आता एप्रिल महिन्याच्या अंतिम टप्प्यात आवकमध्ये वाढ होत असतानाच दरात घसरण सुरु झाली आहे. उत्पादनात घट आणि दरात घसरण काहीही झाले तरी नुकसान मात्र टळलेले नाही. मुंबई-वाशी मार्केटमध्ये आंब्याची सर्वाधिक आवक ही रत्नागिरी जिल्ह्यातून होत आहे.

Mango : निसर्गाच्या लहरीपणानंतर आता आंबा दरात घसरण, शेवटी नुकसान ते नुकसानच..!
आंबाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 10:44 AM

रत्नागिरी : हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे (Mango Production) आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. हे कमी म्हणून की काय आता एप्रिल महिन्याच्या अंतिम टप्प्यात आवकमध्ये वाढ होत असतानाच (Mango Rate) दरात घसरण सुरु झाली आहे. उत्पादनात घट आणि दरात घसरण काहीही झाले तरी नुकसान मात्र टळलेले नाही. (Mumbai Market) मुंबई-वाशी मार्केटमध्ये आंब्याची सर्वाधिक आवक ही रत्नागिरी जिल्ह्यातून होत आहे. आतापर्यंत उत्पादनात घट असल्याने शेतकरी चिंतेत होते तर आता आवक वाढताच दरात घसरण सुरु झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंब्यावर वातावरणाचा एवढ्या प्रमाणात परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे आवक वाढत असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे मागणीतही घट झाल्याचा परिणाम थेट दरावर होत आहे.

वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली

रत्नागिरी जिल्ह्यातून मुख्य बाजारपेठांमध्ये आवक होते. यामध्ये मुंबई, पुणे, वाशी यासारख्या बाजारपेठांचा समावेश आहे. हंगामाच्या सुरवातीपासून अवकाळीमुळे आंब्याची आवक ही कमीच राहिलेली होती. त्याचा परिणाम थेट फळबागायतदार शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झालेला आहे. दरम्यान, वातावरण निरफ्र राहिले तर पुन्हा एप्रिल महिन्याच्या अंतिम टप्प्यात आंब्याची आवक सुरु होईल असा अंदाज आंबा उत्पादक संघाने व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे आता होऊ लागले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईतील वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढत आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळत नाही.

कशामुळे घटले आंब्याचे दर?

हंगामाच्या सुरवातीला यंदा आंब्याची चवही चाखायला मिळते की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. असे असले तरी सातत्याने वातावरणात बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे म्हणावी तशी आंब्याला मागणीच राहिली नाही. मुंबईतील वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढलीय. शुक्रवारी दिवसभरात वाशी मार्केटमध्ये 55 हजार पेट्यांची आवक झाली. मात्र, 5 डझन पेट्यांच्यामागे 1 हजार रुपयांनी दर घसरलेले आहेत. त्यामुळे उत्पादन पदरी पडूनही काय उपयोग असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच सर्वाधि आवक

यंदा ऊन, वारा आणि पाऊस या सर्वांचा परिणाम कोकणातील आंबा पिकावर झाला होता. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, अंतिम टप्प्यातील आंबा उत्पादनावर शेतकरी आशादायी होते. या दरम्यानच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावली नसल्याने आंबा फळपिक शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे. मुख्य मार्केटमध्ये अधिकतर आंबा हा रत्नागिरी जिल्ह्यातून दाखल होत आहे.

संबंधित बातम्या :

Orchard Cultivation : फळबाग लागवड आता अधिक सोईस्कर, कमी क्षेत्रात जास्तीचा लाभ, नेमकी योजना काय?

Soybean Crop : बियाणांची उगवण क्षमता तपासा अन् मगच चाढ्यावर मूठ ठेवा, खरीप हंगामपूर्व बैठकांमध्ये कृषी विभागाचा सूर

Mahabaleshwar Rain : महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये गारांचा पाऊस! पर्यटकांची धांदल, स्ट्रॉबेरीलाही फटका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.