रिसोड बाजार समितीत हळदीची आवक वाढली, वाहनांच्या रांगा…
गेल्या काही वर्षांत रिसोड परिसरातील अनेक गावांमध्ये हळदीचे विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. पूर्वी हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांना हिंगोली शिवाय पर्याय नव्हता.
वाशिम : वाशिमच्या (WASHIM) रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्यातून एक दिवस हळद खरेदी (buy turmeric) केली जाते. मात्र आतापर्यंत कधीच हळद मोठ्या प्रमाणात खरेदी झाली, इतक्या मोठ्या प्रमाणात हळदीची रेकॉर्डब्रेक १४ हजार क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याचे दिसत आहे. ही हळद मोजायला किमान दोन दिवस लागतील, असे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. हळदीचं उत्पादन अधिक झाल्यामुळे शेतकरी (Agricultural news in marathi) वर्ग अधिक खूश आहे. हळद अधिक बाजारात उपलब्ध झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना चांगलचं काम लागलं आहे.
गेल्या काही वर्षांत रिसोड परिसरातील अनेक गावांमध्ये हळदीचे विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. पूर्वी हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांना हिंगोली शिवाय पर्याय नव्हता. मात्र, रिसोडच्या बाजार समितीने हळद खरेदीचे दालन खुले करून दिल्याने शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे. दरम्यान, ९ जून रोजी हळद खरेदी केली जाणार असल्याने ८ जूनपासूनच काही शेतकऱ्यांनी आपापली वाहने बाजार समिती परिसरात लावणे सुरू केले. सकाळी चार वाजेपासून पुन्हा वाहने रांगेत लागत गेली. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, हळदीची एकूण आवक १४ हजार क्विंटलपेक्षा अधिक असून त्यात हळद गट्ट आणि हळद कंडीचा समावेश होता.
अकोल्यात कृषी विभागाकडून होत असलेल्या कंपन्यांवरील कारवाई बोगस आहे. हे वसुली पथक असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोगस बियाणे आणि औषधी साठ्यावर कृषी विभागाने धाडी टाकल्याच उत्तर मिटकरी यांना दिलं आहे. धाडी टाकताना अधिकाऱ्यांनी पैश्याची मागणी केली असेल, तर तक्रारकर्त्याने एसीबीकडे जावे, तक्रारी कराव्या असा सल्ला देखील दिला आहे.