Weather Report : अवकाळीचे संकट टळले, आता वाढत्या ऊन्हाचा चटका, मार्चच्या अखेरीस होणार अंगाची लाहीलाही
भर उन्हाळ्यामध्येही निसर्गाचा लहरीपणा सुरुच आहे. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत आहे. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटी राज्यातील नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार आहे. अरबी समुद्रात सध्या चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तसेच उष्ण लाट क्षेत्रामध्ये वारा वहनातील खंडन याच्या परिणामामुळे महाराष्ट्रात महिन्याच्या अखेरीस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवलेला आहे.
मुंबई : भर उन्हाळ्यामध्येही निसर्गाचा लहरीपणा सुरुच आहे. (Cloudy Weather) ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत आहे. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटी (Maharashtra) राज्यातील नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार आहे. अरबी समुद्रात सध्या चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तसेच उष्ण लाट क्षेत्रामध्ये वारा वहनातील खंडन याच्या परिणामामुळे महाराष्ट्रात महिन्याच्या अखेरीस (Heat wave) उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवलेला आहे. या दरम्यानच्या कालावधीत अवकाळी पावसाचा धोका टळलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळीचे संकट पुन्हा घोंगावणार का अशी परस्थिती निर्माण झाली होती. पण आता अवकाळीतून बळीराजाचा सुटका झाली असली पुढील 5 दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.
मध्य महाराष्ट्र वगळता इतरत्र तापमानात वाढ
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याचा परिणाम मध्य महाराष्ट्रात झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तर आता पश्चिम विदर्भ, कोकण, गोवा या ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. तर उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले गेले आहे. तापमानात कमी-अधिकचा फरक असला तरी पुढील पाच दिवसा राज्यात उष्णतेची लाट राहणार आहे.
महिन्याच्या शेवटी उष्णतेची लाट
मार्च महिन्यातही कधी ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याचे ऊन असेच चित्र होते. मध्यंतरी अवकाळीचा धोका निर्माण झाला होता. मात्र, हे संकट टळले असून आता महिन्यातील 28,29 व 30 मार्च रोजी राज्यात उष्णतेची लाट राहणार आहे. याची चाहूल रविवारपासूनच जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवासाच्या तुलनेत रविवारी उकाड्यात वाढ झाली होती तर सूर्य जणूकाही आग ओकत आहे असेच दुपारी ऊन होते.
रब्बी पिकांवरील संकट टळले
पुन्हा अवकाळी यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर चिंतेचे ढग जमा झाले होते. पण हे ढगाळ वातावरणापर्यंतच मर्यादित राहिल्याने संभाव्य नुकसान टळले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी कामे सुरु आहेत. या दरम्यान जर अवकाळाने अवकृपा दाखवली असती तर उभ्या पिकांचे नुकसान तर अटळच होते पण काढणी झालेली ज्वारीही काळवंडली असती. गेल्या तीन दिवसापासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण होते. अवकाळीने कृपादृष्टी दाखवल्याने मोठे नुकसान टळले आहे.
Isolated Heat Wave are very likely over Western Himalayan Region & Gujarat state during next 3 days; over West MP, Vidarbha & Rajasthan during next 4-5 days; and over south Punjab, south Haryana, Bihar, Jharkhand, north Madhya Maharashtra & Marathwada during 29th-31st March pic.twitter.com/wVTTcnUBTN
— India Meteorological Department (@Indiametdept) March 27, 2022
संबंधित बातम्या :
Chickpea Crop : शेतकऱ्यांनो हमीभावाचाच घ्या आधार अन्यथा होईल नुकसान, ऊन-पावसाच्या खेळात घटले उत्पादन
भविष्यात घरांच्या किंमती आणखी वाढणार? गुढीपाडव्याचा मुहूर्त घर खरेदीसाठी चांगला, पण खिशाला परवडणार?
Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!