Success Story : नांदेडच्या शिवारात फुललीय फणसाची बाग, 7 वर्षाची मेहनत यंदा आली कामी

पारंपरिक पीक पध्दतीला फाटा देऊन वेगळी वाट आणि परीश्रमामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते हे अर्धापूर तालुक्यातील लोणी गावच्या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्यासाठी लोणीच्या भास्कर लोणे यांनी फणसाची लागवड करण्याचा निर्धार केला होता. फणसाच्या बागा शक्यतो कोकण विभागात घेतल्या जातात. पण भौगोलिक स्थिती आणि पोषक वातावरणाचा अभ्यास करुन त्यांनी लोणीच्या शिवारातच हा प्रयोग करण्याचा निर्धार 7 वर्षापूर्वी केला होता.

Success Story : नांदेडच्या शिवारात फुललीय फणसाची बाग, 7 वर्षाची मेहनत यंदा आली कामी
ना्ंदेडच्या शेतकऱ्याने फणस लागवड केली असून 7 वर्षानंतर यंदा पीक लगडले आहे.
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 10:08 AM

नांदेड : पारंपरिक पीक पध्दतीला फाटा देऊन वेगळी वाट आणि परीश्रमामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते हे अर्धापूर तालुक्यातील लोणी गावच्या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. शेतीमध्ये (Crop Change) वेगळा प्रयोग करण्यासाठी लोणीच्या भास्कर लोणे यांनी (Cultivation of jackfruit) फणसाची लागवड करण्याचा निर्धार केला होता. फणसाच्या बागा शक्यतो (Kokan Division) कोकण विभागात घेतल्या जातात. पण भौगोलिक स्थिती आणि पोषक वातावरणाचा अभ्यास करुन त्यांनी लोणीच्या शिवारातच हा प्रयोग करण्याचा निर्धार 7 वर्षापूर्वी केला होता. आता त्यांची मेहनत आणि शेती व्यवसयातील सातत्य हे कामी आले आहे. कारण 7 वर्षानंतर त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले फणस आता बाजारपेठेत दाखल होत आहे.

7 वर्ष जोपासले फणस

काळाच्या ओघात नगदी आणि हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर आहे. पण लोणीच्या भास्कर लोणे यांनी तब्बल 7 वर्ष कोणत्याही उत्पादनाची अपेक्षा न बाळगता फणसाची जोपासणा केली. नियमित खत आणि सिंचनाचे त्यांनी व्यवस्थापन केले होते. शिवाय रासायनिक खताचा नाही तर सेंद्रीय खताचा वापर करुन हे पीक त्यांनी जोपासले होते. शिवाय नांदेड भागात फणसाचे पीक घेतले जात नसल्याने लोणे यांच्या या फळाला मागणी होत आहे. त्यांनी 55 फळे ही बाजारपेठेत विक्रीसाठी नेले होते. याबदल्यात त्यांना 5 हजार रुपये मिळाले आहेत.

प्रत्येक शेतकऱ्यासाठी उत्तम पर्याय

मराठवाड्यातील शेतकरी हा पारंपरिक पिकांवरच भर देत आहे. त्यामुळे उत्पादनात भर पडत नाही. उलट मेहनत आणि वेळ दोन्हीही वाया जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने असा वेगळा प्रयोग केला तर उत्पादनात भर पडणार आहे. शिवाय फणसासाठी अधिकचा खर्च नसून केवळ पाणी आणि खताचे योग्य नियोजन पदरात पडणार आहे. यासाठी अधिकचा कालावधी लागणार असला तरी यामधून मिळणारे उत्पादनही तसेच असल्याचे भास्कर लोणे यांनी सांगितले आहे. उन्हाळ्यात ऊर्जा, जीवनसत्व, खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात देणारे फळ म्हणून फणसाची ओळख आहे. आता बाजारात फणस फारशी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याच्या या फळाला चांगला भाव मिळत आहे.

उत्पादन कमी अन् अधिकचे दर

मराठावाड्यात फणसाचे उत्पादन क्वचित शेतकरी घेत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणी आहे. शिवाय कोकणातील फणस बाजारपेठेत दाखल झाल्यावरच येथील ग्राहकांना त्याची चव चाखता येते. मागणीनुसार बाजारपेठेत पुरवठा होत नसल्याने अधिकचा दर मिळत आहे. लोणे यांनी केवळ 50 फणस विक्रीसाठी नेले असता त्यांना या बदल्यात 5 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

संबंधित बातम्या :

Pune : मशागतीविना शेती, तरुण शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात

Sugarcane : उसाची तोड झाली, मग खोडव्याचे व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा

PM kisan Yojna : शुभ मुहूर्तावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता! राज्य शासनाकडून याद्यांची पूर्तता

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.