Agricultural : गोगलगायीचा धोका टळणार अन् शेतकऱ्यांना मदतही मिळणार, नेमका काय आहे कृषी विभागाचा उपक्रम?
सोयाबीनसह इतर पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि पावसामुळे झालेले नुकसान पाहता कृषी विभागाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. प्रति हेक्टरावर फवारणी शक्य व्हावी म्हणून शेतकऱ्यांना 750 रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे.
उस्मानाबाद : (Kharif Season) खरीप हंगामात सर्वाधिक पेरा हा (Soybean Crop) सोयाबीनचा झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनवरच अधिकचा भर दिला आहे. असे असतानाच पेरणी होताच पावसाचे थैमान आणि त्यानंतर (Outbreak of snails) शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र, गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. प्रति हेक्टरसाठी शेतकऱ्यांना 750 रुपये दिले जाणार आहेत. केवळ एका हेक्टरसाठीच ही रक्कम दिली जाणार आहे. सोयाबीनवरील आकस्मिक किडीचे नियंत्रण करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार तरी कमी होणार आहेच पण गोगलगायीच्या नियंत्रणाबाबत कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
अशी मिळणार आर्थिक मदत
सोयाबीनसह इतर पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि पावसामुळे झालेले नुकसान पाहता कृषी विभागाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. प्रति हेक्टरावर फवारणी शक्य व्हावी म्हणून शेतकऱ्यांना 750 रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे. फवारणी केलेल्या किंवा इतर किटकनाशकांची पावती ही कृषी कार्यालयात जमा करावी लागणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. केवळ शंकी गोगलगायीमुळे नुकसान झाल्यासच ही मदत केली जाणार आहे.
शेतकऱ्यांची पध्दत चुकीची
शंखी गोगलगायीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरीही प्रयत्न करीत आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांकडून चुकीची पध्दत राबवली जात असल्याने त्याचा धोका पशू-पक्षांना निर्माण झाला आहे. शेतकरी हे चुरमुऱ्याला विषारी औषध लावून शेतामध्ये फेकतात. त्यामुळे ते इतर पशू किंवा पक्षांनी खाल्ले तर त्यांच्या जीवीतासही धोका निर्माण होतो. त्यामुळे ही पध्दत चुकीची असून शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हा आहे उत्तम पर्याय
पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत.