Success Story : हंगामी पिकांचा वणवा तिथे बहरतेय ड्रॅगन फ्रूट शेती, कन्हेरीच्या शेतकऱ्याने कशी साधली किमया?

उत्पादन वाढीसाठी शेतकरी विविध पिकांचे आंतरपिक घेतो. मात्र, बाळासाहेब रामचवरे यांनी 2 एकरातील ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये पांढरा जांभूळ, हापूस आंबा, सफरचंद, फणस अशा वेगवेगळ्या फळांची झाडे लावली आहेत. त्यामुळे नैसर्गिक सौंद्यर्यामध्ये तर भर पडली आहे पण आता त्यांचा उत्पन्नही वाढत आहे. अकोला जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून त्यांना ड्रॅगन फ्रूट फळ लागवडीसाठी 17 लाख रुपये खर्च आला आहे.

Success Story : हंगामी पिकांचा वणवा तिथे बहरतेय ड्रॅगन फ्रूट शेती, कन्हेरीच्या शेतकऱ्याने कशी साधली किमया?
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 10:11 AM

अकोला : शेती म्हणले की एकच सवाल समोर येतो तो म्हणजे कोरडवाहू की बागायती. (Horticulture farming) बागायती शेतीलाच भविष्य आणि कोरडवाहू शेतकरी केवळ हंगामी पिकांचाच मालक हे अलिखित असलेला नियम आहे. पण उत्पादन वाढीसाठी वेडा असलेला शेतकरी काय करुन दाखवतो हे (Akola) जिल्ह्यातील कन्हेरीच्या बाळासाहेब रामचवरे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. पारंपरिक शेती पध्दतीला बाजूला सारुन त्यांनी 2 एकरावर त्यांनी (Dragon Fruit) ड्रॅगन फ्रूट तर लावले आहेच शिवाय पांढरा जांभूळ, हापूस आंबा, सफरचंद, फणस अशा वेगवेगळ्या फळांची लागवड केली आहे. त्यामुळे शेती व्यवसायाकडे नाकारात्मक दृष्टीकोनातून पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सकारात्मक उर्जा घेण्यासाठी रामचवरे यांचा हा यशस्वी प्रयोग पुरता आहे.

2 एकरातील ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये फळांचे आंतरपिक

उत्पादन वाढीसाठी शेतकरी विविध पिकांचे आंतरपिक घेतो. मात्र, बाळासाहेब रामचवरे यांनी 2 एकरातील ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये पांढरा जांभूळ, हापूस आंबा, सफरचंद, फणस अशा वेगवेगळ्या फळांची झाडे लावली आहेत. त्यामुळे नैसर्गिक सौंद्यर्यामध्ये तर भर पडली आहे पण आता त्यांचा उत्पन्नही वाढत आहे. अकोला जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून त्यांना ड्रॅगन फ्रूट फळ लागवडीसाठी 17 लाख रुपये खर्च आला आहे. असे असले तरी वर्षभरात पीक पदरात पडणार शिवाय बाजारपेठेत कायम मागणी असल्याने त्यांनी भविष्यातील सर्वच चिंता मिटवली आहे.

अशिक्षित वडिलांकडूनच मिळाली प्रेरणा

शेती व्यवसयात एक तर योग्य मार्गदर्शन किंवा कुण्या शेतकऱ्यांची प्रेरणा याच गोष्टी उपयोगी ठरतात. बाळासाहेब रामचवरे यांना या दोन्ही गोष्टी अशिक्षित असलेल्या वडिलांकडूनच मिळाल्या आहेत. त्यांचे वडिलही शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग करीत होते. त्यामुळे खर्च अधिकचा होत असला तरी त्याच तुलनेत उत्पन्न हे वाढत होते. अशिक्षित असताना त्यांनी केलेले प्रयोग हेच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे बाळासाहेब यांनी सांगितले आहे. लागवडीसाठी 17 लाख रुपये खर्च झाला असला तरी आता हे पीक 15 ते 17 वर्ष शेतामध्ये राहणार तर लाखोंचे उत्पन्न मिळणारच असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

अश्वासक पिकांमुळे शेती चित्रच बदलणार

तसे पाहयला गेले तर ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन हे परदेशातच अधिक प्रमाणात घेतले जाते. देशामधील परस्थितीमुळे उत्पादन घेणे तसे अव्हानात्मकच होते. पण योग्य नियोजन, कृषी विभागाचे मार्गदर्शन यामुळे हे शक्या झाले आहे. सद्यस्थितीत विदर्भात फारच मोजक्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट फळपिकांची लागवड केली आहे.थायलंड,व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. भविष्यात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट हे आश्वासक पीक होऊ शकते. यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या घटनांनाही आळा बसणार असल्याचे रामचवरे यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.