Grape : अखेर ठरलं तर मग…! शेतकऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट अन् बागायतदार संघाचा ऐतिहासिक निर्णय, काय झालं नेमंक नाशिकमध्ये

गेल्या आठवड्याभरापासून द्राक्ष दराच्या निश्चितीवर नाशिकमध्ये बैठकावर बैठका पार पडत आहेत. अखेर निर्यात होणाऱ्या द्राक्षाचे दर हे द्राक्ष बागायतदार संघाने ठरवले असून बागायतदार शेतकऱ्यांनी त्या दराला सहमती दर्शवलेली आहे. उत्पादन खर्चावर आधारित किमान 10 टक्के नफा पकडून हे दर ठरवण्यात आले आहेत.

Grape : अखेर ठरलं तर मग...! शेतकऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट अन् बागायतदार संघाचा ऐतिहासिक निर्णय, काय झालं नेमंक नाशिकमध्ये
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 12:54 PM

नाशिक : गेल्या आठवड्याभरापासून (Grape prices) द्राक्ष दराच्या निश्चितीवर (Nashik) नाशिकमध्ये बैठकावर बैठका पार पडत आहेत. अखेर निर्यात होणाऱ्या द्राक्षाचे दर हे द्राक्ष (Horticulture Association) बागायतदार संघाने ठरवले असून बागायतदार शेतकऱ्यांनी त्या दराला सहमती दर्शवलेली आहे. उत्पादन खर्चावर आधारित किमान 10 टक्के नफा पकडून हे दर ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार जानेवारी महिन्यात प्रतिकिलो 82 रुपये, फेब्रुवारी महिन्यात 71 तर मार्चमध्ये 62 रुपये हा कमीत कमी दर करण्यात आला आहे. द्राक्षांच्या दराबाबत हा ऐतिहासिक निर्णय असून शेतकऱ्यांनीही हे दर एकमताने मान्य केले आहेत. या निर्णयामुळे एक नवा पायंडा आता पडणार आहे हे नक्की.

टाळ्यांचा कडकडाट अन् ठरावास पाठिंबा

एखाद्या शेतीमालाच्या दराच्या अनुशंगाने सर्व शेतकऱ्यांचे एकमत होणे शक्य नसते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान आणि सरकारची बदलती भूमिका यामुळे सर्वच द्राक्ष उत्पादित शेतकऱ्यांना याचा फटका बसत होता. गेल्या 15 दिवसांपासून दर निश्चितीची प्रक्रिया ही सुरु होती. अनेक बैठका पार पडल्यानंतर महिन्याच्या फरकाने दर कसे राहतील यावर एकमत झाले आहे. एवढेच नाही तर कुणीही ठरलेल्या दरापेक्षा कमीने विक्री करायची नाही असा ठरावच घेण्यात आला आहे. बागायदार संघटनांनी हा ठराव मांडताच शेतकऱ्यांनी याला सहमती दर्शवली व ठराव मंजूर होताच एकट जल्लोष करण्यात आला.

शेतकरी दिन दिवशीच झाली क्रांती

राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या 61 वर्धापन दिन व राष्ट्रीय शेतकरी दिवसाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत येथील सभागृहात हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निर्यात द्राक्षावर लावण्यात येणारी जीएसटी तसेच विविध कर कमी करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या सर्व बाबींचा सरकारला विसरच पडत होता. त्यामुळे नुकसान होऊनही कमी दराने द्राक्ष विक्रीची नामुष्की होती. त्यामुळे बागायतदार संघाने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

बाजारपेठेचाही अभ्यास होणे गरजेचे आहे

बाजारपेठेत द्राक्ष केवळ हंगामातच असावे असे नाही. ग्राहकांकडून वर्षभर मागणी ही असतेच. त्यांच्या मागणीनुसार पुरवठा होणे गरजेचे आहे. तरच दर हे टिकून राहणार आहेत. द्राक्ष मार्केटींगची खऱी सुरवात ही नाशिकमध्येच झाली होती. शिवाय दराचा ऐतिहासिक निर्णयही नाशिकमध्येच झाला आहे. त्यामुळे वर्षभर टप्याटप्प्याने मालाची आवक होणे गरजेचे आहे. सरकार जे करु शकत नाही ते द्राक्ष उत्पादक संघ आणि शेतकऱ्यांनी करुन दाखवलेले आहे. आता आगामी महिन्यापासून बाजारात दाखल होणारे द्राक्ष हे ठरवलेल्या दराप्रमाणेच असतील असेही सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, एक मेसेज कोट्यावधी लाभार्थ्यांना

आंबा बागांचे नुकसान होऊनही फळपीक विमा योजनेकेडे बागायतदारांची पाठ, काय आहेत कारणे?

अवकाळीमुळे आंबा बागांचे नुकसान आता वाढत्या थंडीचा काय होणार परिणाम? शेतकऱ्यांचे लक्ष वातावरणाकडे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.