शेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय ? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या

शेतीच्या वादातून अनेक कुटुंब ही विभक्तही झाली आहेत. असे असले तरी शेती कोणी कसायची आणि उत्पादनाची विभागणी कशी करायची हा प्रश्न कायम राहिलेला आहे. त्यामुळेच शेतजमिनीची खाते फोड करुन हा प्रश्न मार्गी लावला जाण्यावर अधिकचा भर राहिलेला आहे.

शेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय ? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 4:40 PM

मुंबई : शेती (agriculture)  हा विषय आजही वादाच्या कळीचा मुद्दा आहे. (Dispute over farm land) शेतीवरुन अनेक मतभेद पाहवयास मिळतात. एकत्र कुटुंबपध्दती जसा लोप पावत गेली अगदी त्याप्रमाणेच एकत्रित शेती करणेही आता काळाच्या ओघात कमी झाले आहे. एवढेच नाही तर शेतीच्या वादातून अनेक कुटुंब ही विभक्तही झाली आहेत. (Farmer) असे असले तरी शेती कोणी कसायची आणि उत्पादनाची विभागणी कशी करायची हा प्रश्न कायम राहिलेला आहे. त्यामुळेच शेतजमिनीची खाते फोड करुन हा प्रश्न मार्गी लावला जाण्यावर अधिकचा भर राहिलेला आहे.

नेमकी खाते फोड म्हणजे काय आजही अनेकांना याची माहिती नसते. मात्र, अशा पध्दतीने शेताची विभागणी झाली तर भांडणाचे समुळ नष्ट होणार आहे. त्यामुळे आता खाते फोड ही केलीच जात आहे. शिवाय खाते फोड केल्यावर शासकीय योजना आणि अनुदानही सर्वाना समप्रमाणात मिळते त्यामुळेही खातेफोड केली जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी आहे कशी याची माहिती आपण घेणार आहोत.

काय आहे खातेफोड प्रक्रिया?

खातेफोड म्हणजे थोडक्यात जमिनीची विभागणी. महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 प्रमाणे जमिनीची खातेफोड केली जाते. त्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार ज्या कुटुंबाच्या जमिनीचे खातेफोड करायचे आहे, त्या कुटुंबातील सगळ्यांनी चर्चा करावी. अंतिम निर्णय कसा ठरला याबाबत सर्वांमध्ये कच्चा आराखडा तयार करावा. यामध्ये चतुर्सिमा दर्शवावी लागते.

खातेफोडसाठी सर्वांची सहमती अत्यावश्यक

खाते फोडसाठीच्या प्रक्रियेसाठी संबंधित गट नंबरमध्ये जेवढे जमीनधारक व त्यांचे अपत्य आहेत, त्या सगळ्यांची संमती असणे आवश्यक असते. ठरविल्याप्रमाणे जर खातेफोड करण्यास एकाची जरी संमती नसली तरी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याअगोदरच कुटुंबातील सर्वाची परवानगी घेणे गरजेचे आहे.

यानंतरच सारबारा उतारे वेगळे करता येतात

कुटुंबातील सर्व सदस्यांची परवानगी आहे हे ठरल्यानंतरच विहित नमुन्यातील फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यासोबत सातबारा उतारा, 8 अ, कुटुंबातील सर्वांची ओळखपत्र, शेत जमिनीची कागदपत्रे जोडून तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल करावा लागतो. सदरचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो योग्यरीत्या तपासून तहसीलदार प्रत्येकाला नोटिशीद्वारे कळवून सुनावणीसाठी तारीख देतात. हे सुनावणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर तहसीलदार संबंधित तलाठी व मंडळ निरीक्षकांना आदेश देतात. त्याप्रमाणे नोंद करून ती मंजूर करून घ्यावी लागतात आणि नंतरच ठरल्याप्रमाणे सातबाराचे उतारे वेगळे होतात.

आवश्यक माहिती

हा फार्म एकूण दहा पाणी असतो. यामध्ये जमिनीचा तपशील, जमिनीचे क्षेत्र, घोषणा पत्र, तलाठ्याचा आदेश, सर्वांचे प्रतिज्ञापत्र, नोटिसा, जमीन वाटपासंबंधी तपशीलवार माहिती, अंतिम आदेश इत्यादी माहिती असते. (The process of sharing the farm land is like this, )

संबंधित बातम्या :

सरकारच्या धोरणावरच ठरणार तुरीचे दर, शेतकऱ्यांना आशा हमीभाव केंद्राची

गळीत हंगामाला सुरवात मात्र, थकीत ‘एफआरपी’ रकमेचा मुद्दा कायम ; 43 कारखाने परवान्याच्या प्रतिक्षेत

दोडक्याच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न, पण ‘या’ पध्दतीचा करावा लागणार अवलंब

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.