Cotton : शेतकऱ्यांना मिळाला पांढऱ्या सोन्याचा आधार, आता केवळ फरदड शिल्लक, जाणून घ्या कसा राहिला हंगाम!

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील उत्पादनात घट झाली असली तरी त्याची कसर ही वाढत्या दरातून भरुन निघालेली आहे. खरीप हंगामातील सोयाबीनला सरासरी दर मिळाला असला तरी कापसाला मात्र, यंदा विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे किमान उत्पादनावर झालेला खर्च तरी भरुन निघालेला आहे. गेल्या 50 वर्षामध्ये जो कापसाला दर मिळाला नाही तो यंदा वाढत्या मागणीमुळे मिळालेला होता.

Cotton : शेतकऱ्यांना मिळाला पांढऱ्या सोन्याचा आधार, आता केवळ फरदड शिल्लक, जाणून घ्या कसा राहिला हंगाम!
यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 12:11 PM

नंदुरबार : निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) खरिपातील उत्पादनात घट झाली असली तरी त्याची कसर ही वाढत्या दरातून भरुन निघालेली आहे. खरीप हंगामातील सोयाबीनला सरासरी दर मिळाला असला तरी कापसाला मात्र, यंदा विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे किमान उत्पादनावर झालेला खर्च तरी भरुन निघालेला आहे. गेल्या 50 वर्षामध्ये जो (Cotton Rate) कापसाला दर मिळाला नाही तो यंदा वाढत्या मागणीमुळे मिळालेला होता. एवढेच नाही तर मुख्य पिकातून उत्पादन घेतल्यानंतर वाढत्या दरामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी फरदड मधूनही उत्पादन घेतले आहे. आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. (Nandubar District) नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरा आधार मिळाला तो बाजार समितीने उभारलेल्या केंद्राचा. हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर मिळत असल्याने गेल्या 15 दिवसांमध्ये 1 हजार 500 क्विंटल कापसाची आवक झाल्याचे बाजार समितीच्या प्रशासकाने सांगितले आहे.

7 हजाराहून कापूस 11 हजार 200 रुपयांवर

अतिपाऊस आणि वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात घट ही निश्चित होती. परिणामी उत्पादन घटल्यामुळे चांगला दर मिळाल्याशिवाय कापसाची विक्री नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळेच यंदा सुरवातच शेतकऱ्यांनी कलेल्या अपेक्षे प्रमाणे झाली होती. सुरवातीच्या काळात 7 हजार रुपये प्रति क्विंटल रुपये असा दर मिळाला होता तर अंतिम टप्प्यात वाढत्या मागणीमुळे 11 हजार 200 रुपयांपर्यंत दर पोहचले आहेत. गेल्या 50 वर्षात मिळाला नाही असा दर यंदा कापसाला मिळाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर ही वाढीव दरामुळे निघाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

काय आहे नंदुरबार जिल्ह्यातील अवस्था?

नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिवाय येथे खेडा खरेदी केंद्र असल्याने शेतकऱ्यांना मार्केट जवळच आहे. जिल्ह्यात यंदा कापूस खरेदी उशिराने सुरू झाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना कापूस विक्री केली. मात्र, बाजार समिती मार्फत खरेदी सुरू झाली आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला चांगला मिळू लागला. यावर्षी सुरुवातीला कापसाला 7 ते 8 हजारांपर्यंत भाव मिळेल होता. त्यानंतर दीड महिन्यात कापसाचे दर हे सातत्याने वाढते राहिले होते. गेल्या 15 दिवसांत कापसाचा दर 10 हजार 200 ते 11 हजार 200 पर्यंत जावून ठेपला होता. या दरामुळे दरदिवशी किमान 100 वाहनातून दीड हजार क्विंटल कापूस आवक होत होता. जिल्ह्यात या हंगामामध्ये आतापर्यंत 40 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे.

आता केवळ फरदड शिल्लक

मुख्य हंगामातील कापसाची विक्री झाली असली तरी आणखीन महिनाभर कापसाची खरेदी सुरू राहणार आहे. कारण वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी फरदचे उत्पादन घेतले आहे. काही दिवसांमध्ये परत भाव वाढण्याची शक्यता बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर वर्तविण्यात येत आहे. तर कृषी तज्ञ यांच्याकडून सांगण्यात येत आहे की, सध्या कापसाचा दर्जा तसा राहिलेला नाही. फरदडचा कापूस बाजारपेठेत येत असल्याने त्याचा परिणाम हा दरावर झालेला आहे.

संबंधित बातम्या :

स्वप्न सत्यामध्ये : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता, 1 किलोमीटरला 24 लाख रुपये

द्राक्षाचे दर ठरले अन् मोडले, आता पपईच्या निर्णयाचे काय होणार? व्यापाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष..!

Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.