आता खरीप हंगामातही घेता येणार हरभरा अन् राजमाचे उत्पादन, काय आहेत फायदे ?

यंदाच्या उन्हाळी हंगामात जसे सोयाबीनचा पेरा वाढत आहे अगदी त्याप्रमाणेच आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना हरभरा आणि राजमा पिकाचे उत्पादन घेता येणार आहे. उत्पन्न वाढीसाठी असे प्रयोग सध्या केले जात असून खरीप हंगामात राजमा पीक हे 60 ते 70 दिवसांमध्ये पदरी पडते.

आता खरीप हंगामातही घेता येणार हरभरा अन् राजमाचे उत्पादन, काय आहेत फायदे ?
उन्हाळी हंगामातील हरभरा पीक
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 7:15 AM

पुणे : यंदाच्या उन्हाळी हंगामात जसे सोयाबीनचा पेरा वाढत आहे अगदी त्याप्रमाणेच आगामी (Kharif season) खरीप हंगामात शेतकऱ्यांना (gram crop) हरभरा आणि राजमा पिकाचे उत्पादन घेता येणार आहे. उत्पन्न वाढीसाठी असे प्रयोग सध्या केले जात असून खरीप हंगामात राजमा पीक हे 60 ते 70 दिवसांमध्ये पदरी पडते. बारामती तालुक्यातील माळेखुर्द येथील राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्थेने हा प्रयोग केला असून उत्पन्न वाढीसाठी खरीप हंगामात हरभरा आणि राजम्याचे पीक दिसले तर विशेष वाटायला नको. उन्हाळी हंगामात देखील यंदा सोयाबीनचे क्षेत्र हे 2 लाख हेक्टरापर्यंत गेले आहे. त्यामुळे खरिपातील बियाणांचा प्रश्न तर मार्गी लागणारच आहे शिवाय उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

असा झाला प्रयोग यशस्वी

माळेगाव खुर्द च्या अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या प्रायोगिक क्षेत्रावर 10 जून ला राजमा आणि हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यामध्ये हरभरा पिकाच्या 74 वाणांची लागवड केली होती. या वाणाची लागवड सरी वरंभ्यालगत केली गेली होती. जे की खत व पाणी योग्य पद्धतीने दिल्याने खरीप हंगामात हे पीक यशस्वीपणे आले आहे. खरीप हंगामात राजमा पिकाच्या माध्यमातूनही अधिकेचे उत्पादन मिळणार आहे. पेरा केल्यापासून 60 ते 70 दिवसांमध्ये पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.

अनोख्या प्रयोगामुळे उत्पन्नामध्येही वाढ

रब्बी हंगामात यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे ती, हरभऱ्याची. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून त्याचा दरावर परिणाम होणार असल्याचा अंदाच कृषितज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे यंदा खरीपात देखील हरभऱ्याचा पेरा केला तरी उत्पन्न वाढीच्या अनुशंगाने महत्वाचे राहणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आधी हवामानाचा अभ्यास करून रब्बी हंगामात हरभरा तसेच राजमा चे पीक घेतात. परंतु मार्केटमध्ये मागणीपेक्षा जास्त उत्पादन आलं तर शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे हा पर्याय फायदेशीर ठरणार आहे.

खरीप हंगामात हरभरा पिकाचे फायदे :-

– खरीप हंगामात आपण ऊसाबरोबर आंतरपीक म्हणून हरभराचे पीक घेऊ शकतो. – जमिनीची पोत सुधारण्यासाठी फायदेशीर. – खरीप हंगामात हरभऱ्याचे फक्त 60-65 दिवसांमध्ये उत्पन्न घेता येते. -. ऑफ सीझनमध्ये हरभरा ला चांगला दर मिळतो. – रब्बी हंगामात बियाणे म्हणून याचा उपयोग

संबंधित बातम्या :

Onion | उन्हाळी हंगामातील कांद्याच्या ‘झळा’ शेतकऱ्यांनाच, आठ महिने साठवणूक करुनही पदरी काय पडले?

Chemical fertilizer : रब्बी हंगामात दुहेरी संकट, रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हतबल

कृषी आयुक्तांची एक सुचना अन् हळद लागवडीचे गुपीत आले बाहेर, उत्पादन वाढीबाबत काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला ?

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.