Positive News : अलिबागच्या पांढऱ्या कांद्यालाही भौगोलिक मानांकन, वेगळी ओळख अन् शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे अशी मागणी अलिबागच्या शेतकऱ्यांकडून केली जात होती. एवढेच नाहीतर येथील पांढऱ्या कांद्याचे गुणधर्मही पटवून दिले जात होते. रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलीबागच्या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानाकान प्राप्त झालं आहे. एवढेच नाही तर केंद्र शासनाच्या पेटंट विभागाने या बाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने या कांद्याला स्वतःची ओळख मिळाली आहे.
रायगड : भात उत्पादक म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख असली तरी आता आणखी मानाचा तुरा जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला जाणार आहे. जिल्ह्यातील (Alibag) अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला आता (Geographical Rating) भौगोलिक मानांकन मिळाले आहे. अर्थात G.I हा टॅग मिळाला असून येथील (White Onion) पांढऱ्या कांद्याचा दर्जा, चव आणि उत्पादन क्षमता यावर हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा पाठपुरावा अखेर शेतकऱ्यांच्या कामी आला आहे. यामुळे पांढऱ्या कांद्याचे वेगळे असे महत्व तर राहणार आहेच पण येथील कांद्याला आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असून उत्पादनातही वाढ होणार आहे. कृषी विद्यापीठ, भौगोलिक निर्देशांक आणि शेतकरी उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाने दिली मान्यता
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे अशी मागणी अलिबागच्या शेतकऱ्यांकडून केली जात होती. एवढेच नाहीतर येथील पांढऱ्या कांद्याचे गुणधर्मही पटवून दिले जात होते. रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलीबागच्या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानाकान प्राप्त झालं आहे. एवढेच नाही तर केंद्र शासनाच्या पेटंट विभागाने या बाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने या कांद्याला स्वतःची ओळख मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा पाठपुरावा अखेर कामी आला आहे. 15 जानेवारी 2019 रोजी या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी नोंदणी करण्यात आली होती.
या गावच्या शेतकऱ्यांना होणार अधिकचा फायदा
रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलीबागच्या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानाकान प्राप्त झालं आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, वडगावांसह परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. याकरिता कृषी विद्यापीठ, शेतकरी उत्पादक संघाचे प्रयत्न सुरु होते. कांद्याचे वैशिष्ट्य हे पटवून दिले जात होते. दीड वर्ष केलेला पाठपुरावा आता कामी आला असून या कांद्याची ओळख ही सातासमुद्रापार होणार आहे.
फसवणूकीला आळा, उत्पादनात वाढ
एखाद्या वस्तूला किंवा पिकाला विशिष्ट ठिकाणाचा जीआय टॅग मिळाला की त्या सर्वांना त्या ठिकाणला एक वेगळे महत्व येते. बाजारात दर्जेदार व अस्सल पांढरा कांदा ग्राहकांना मिळणार. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा उत्साह आता दुणावला असून यापेक्षा अधिकचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करणार आहेत तर उत्पन्नवाढीसह शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पांढऱ्या कांद्याला अधिकचे महत्व प्राप्त होणार आहे. जीआय च्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूकही आता टळणार आहे.