Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara : शासकीय गोदामेही रामभरोसे, शेतकऱ्याच्या 64 क्विंटल धानाची चोरी

विदर्भात धान खरेदीसाठी महामंडळाच्या माध्यमातून खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे धान पिकाचे उत्पादन वाढले आहे. शिवाय शेतकऱ्यांना खरेदी केंद्राशिवाय कशाचाच आधार नसल्याने शेतातला माल थेट खरेदी केंद्रावर आणला जात आहे. खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आक्रमकता दाखविल्याने तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत.

Bhandara : शासकीय गोदामेही रामभरोसे, शेतकऱ्याच्या 64 क्विंटल धानाची चोरी
धान पीक
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:41 AM

भंडारा : आतापर्यंत शेत शिवारात साठवलेल्या (Theft of agricultural goods) मालाच्या चोरीच्या घटना अनेक झाल्या आहेत. पण ज्या उद्देशाने (Warehouse) शासकीय गोदामे उभारण्यात आली आहेत त्यालाच अव्हान देत लाखनी तालुक्यातील पोहरा येथील गोदामातून चक्क 64 क्विंटल (Paddy Crop) धान लंपास केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे गोदामात साठवलेला माल सुरक्षितच आहे असे नाही. शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे मग ते शेत शिवारात असो की सुरक्षित ठिकाणी. तब्बल 64 धान चोरीला गेल्याने शासकीय गोदामातील सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरेदी केंद्रावरील माल शासकीय गोदामात

विदर्भात धान खरेदीसाठी महामंडळाच्या माध्यमातून खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे धान पिकाचे उत्पादन वाढले आहे. शिवाय शेतकऱ्यांना खरेदी केंद्राशिवाय कशाचाच आधार नसल्याने शेतातला माल थेट खरेदी केंद्रावर आणला जात आहे. खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आक्रमकता दाखविल्याने तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. याच खरेदी केंद्रावरील धान हे शासनाने ठरवून दिलेल्या गोदामाता साठवले जाते. आता शासकीय गोदामामधीलही धान्य चोरीला जाऊ लागल्याने चिंता व्यक्त होते आहे.

अशी घडली घटना

लाखनी तालुक्यातील पोहरा येथील शासकीय गोदामात खरेदी केंद्रावर घेतलेल्या धानाची साठवणूक केली जाते. आतापर्यंत या गोदामात 3 हजार 280 क्विंटल धानाची साठवणूक केली आहे. मात्र, या गोदामात ग्रेडर आणि हमाल आले असता त्यांना गोदामाचे शटर तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या दोघांनी गोदामात जाऊन पाहणी केली असता धानाची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये 64 क्विंटल धान चोरीला गेले आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने गोदामामध्ये शेतीमाल साठवला जातो त्यालाच धोका निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शासकीय गोदामातील हमाल व ग्रेडर यांच्याकडून घटनेची माहिती मिळताच सोसायटीचे अध्यक्ष विष्णू गिरिपुंजे यांनी लाखनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. गोदामात साठवलेल्या 3 हजार 280 क्विंटल धानापैकी 64 क्विंटल धानाची चोरी झाली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र, गोदामातील साठवणूक क्षमता आणि सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.