AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहो खरंच..! कांद्याचीही चोरी, नैसर्गिक संकटावर मात केली पण….

एखाद्या वस्तूचे दर वाढले की काय होते याचा प्रत्यय धुळ्यातील कुसुंबा परिसरात आलेला आहे. विक्रीला आलेला 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी लंपास केला आहे. सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. शिवाय दिवसागणिक दरात वाढ होत आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या कांद्याची थेट चोरीच झाल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आहो खरंच..! कांद्याचीही चोरी, नैसर्गिक संकटावर मात केली पण....
कांदा
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 6:42 PM

धुळे : नैसर्गिक संकटामुळे (Farmer) राज्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे. हे कमी म्हणून की काय आता भलत्याच संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. (Onion) एखाद्या वस्तूचे दर वाढले की काय होते याचा प्रत्यय (Dhule) धुळ्यातील कुसुंबा परिसरात आलेला आहे. विक्रीला आलेला 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी लंपास केला आहे. सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. शिवाय दिवसागणिक दरात वाढ होत आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या कांद्याची थेट चोरीच झाल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीपातील कांद्याचे भवितव्य अंधारात आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगराईचा प्रादुर्भाव झालेला आहे. कांद्याची वाढच खुंटल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कांदाचाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला सोन्याचा भाव मिळत आहे. शिवाय कांद्याची आवक कमी राहिली तर भविष्यात दर हे वाढणार आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील शेतकरी सुभाष रामराव शिंदे यांनी कांदा चाळीत 150 क्विंटल कांद्याची साठवणूक केली होती.

कांद्याला चांगला दर मिळाला म्हणून त्यांनी 15 क्विंटल कांद्याची विक्री केली होती. शिवाय उर्वरीत 100 क्विंटल कांदा तसाच कांदाचाळीत साठवला होता. आवक अशीच कमी राहिली तर दर चांगला मिळेल अशी आशा सुभाशराव यांना होती. पण रात्री भलतेच काही घडले आणि कांदा चाळीतील 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी लंपास केला. त्यामुळे पावसासारख्या नैसर्गिक संकटावर सुभाषराव यांना कांदा चाळीमुळे मात करता आली पण चोरट्यांने त्यावर डल्ला मारलाच. त्यामुळे त्यांचे तब्बल 3 लाख 50 हजाराचे नुकसान झाले आहे.

यामुळे केली होती कांद्याची साठवणूक

कांद्याचे दर हे रात्रीतून कमी होतात अगदी त्याप्रमाणे ते वाढतातही. कांद्याचे दर साधायचे असतील तर अधिकतर शेतरकरी आता कांदाचाळीचा वापर करीत आहेत. त्याचप्रमाणे सुभाष शिंदे यांनी कांद्याची साठवणूक केली होती. शिवाय अपेक्षेप्रमाणे कांद्याचे दरही वाढत होते. प्रतिकिलो 40 चा दर मिळत होता म्हणून शिंदे यांनी गत आठवड्यात 15 क्विंटल कांद्याची विक्रीही केली होती. ज्यादा दर मिळल्यास उर्वरीत कांद्याची विक्री करण्याचा त्यांचा मानस होता पण विपरीतच घडले. चोरट्यांनी होत्याचे नव्हते केले.

3.5 लाख रुपयांचा चोरीला गेलेला कांदा

कांद्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे साठवलेल्या कांद्यावरच चोरट्यांच्या नजरा आहेत. कुसुंबा भागातीलच शेतकरी प्रफुल्ल शिंदे हे सकाळी शेतात गेले असता साठलेले कांदे विस्कटलेल्या अवस्थेत होते. त्यांनी लागलीच याची माहिती सुभाष शिंदे यांना दिली होती. एकंदरीत कांद्याचे दर वाढत असल्याने चोरीच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट निर्माण होत आहे. आजच्या बाजारभावानुसार सुभाष शिंदे यांचा साडेतीन लाख रुपयांपर्यंत कांदा चोरीला गेला आहे. शेतकऱ्याने तातडीने धुळे तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चांगला दर मिळाला पण फायदा नाही झाला

सुभाष शिंदे शेतकरी म्हणाले की, सर्वांच्या बियाण्यांचे नुकसान झाल्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांचे बियाणे खराब झाले आहे मी चार हजार रुपये किंमतीचे उच्च प्रतीचे बियाणे असलेले कांदे लावले होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून साठलेल्या कांद्याची स्थिती चांगली आहे. काही दिवसांपूर्वी भाव कमी असल्याने कांद्याची विक्रीच केली नव्हती. पण आता कांद्याच्या दरात चांगली वाढ झाल्याने सहा महिन्यापासून साठवलेला कांदा हा विक्रीसाठी काढला होता. पण चोरीला गेलेल्या कांद्याला साडेतीन लाख गमवावे लागले. (theft-stolen-due-to-increase-in-onion-prices-type-of-khabad-in-dhule-district)

संबंधित बातम्या :

वारे बहाद्दर ! 10 हजार सोयाबीनला भाव, तरच व्यापाऱ्यांना गावात ‘एंन्ट्री’

सागवान शेतीमध्ये मुबलक पैसा, गरज आहे ‘ती’ अभिनव उपक्रमाची

गाळप सुरु होण्याच्या तोंडावर थकीत ‘एफआरपी’ रक्कम अदा, साखर आयुक्तालयाचा ‘कडू’ टोला झाला ‘गोड’

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.