AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM KISAN : सर्वकाही करुनही ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही 10 वा हप्ता !

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 व्या हप्त्याची. असे असले तरी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्व प्रक्रिया पूर्ण करुनही लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होणार नाही. पैसे जमा होण्यास काही अवधी असतनाच असा निर्णय का असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल पण ही प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.

PM KISAN : सर्वकाही करुनही 'या' शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही 10 वा हप्ता !
पंतप्रधान किसान सन्मान योजना
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:28 AM

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती ( PM Kisan Samman Nidhi Yojana) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याची. असे असले तरी लाखो (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्व प्रक्रिया पूर्ण करुनही लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होणार नाही. पैसे जमा होण्यास काही अवधी असतनाच असा निर्णय का असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल पण ही प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. आयकर भरणाऱ्यांसाठी ह्या योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, अशा लाखो लोकांनी अर्ज केला होता. अशा लोकांची ओळख आता आधार कार्डद्वारे झाली. आता त्यांच्याकडून पैसे परत घेतले जात आहेत. सर्वात जास्त म्हणजे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे. बेकायदेशीरपणे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी 56 टक्के लोक आयकर भरणारे आहेत.

शेतकऱ्यांकडूनच परतावा

तळागळातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा ही केंद्र सरकारची भूमिका होती. मात्र, आयकर अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. असे असतानाही नियम डावलून योजनेच्या लाभ घेणाऱ्यांमध्ये अशाच शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय अनाधिकृतपणे योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी, फोन नंबर हे ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात आले होते. ऐवढेच नाही तर त्यांनी लाभ घेतलेली रक्कम महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना आता या 10 हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

यांना नाही मिळणार योजनेचा लाभ

*घटनात्मक पदावर असणाऱ्या किंवा यापूर्वी पदावर राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. तसेच विद्यमान किंवा माजी मंत्री, महापौर किंवा पंचायत समिती सभापती, आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार तसेच शासकीय नौकरदार भले त्यांना शेती असली तरी योजनेचा लाभ मिळणार नाही.

*गेल्या आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन असलेल्या शेतकऱ्यांनाही फायदा होणार नाही व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते, सीए, वकील आणि आर्किटेक्ट या योजनेतून वगळण्यात आले आहे.

हे आहेत योजनेचे लाभार्थी

ज्या शेती व्यवसायावर शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे तेच खरे शेतकरी असे राष्ट्रीय शेतकरी धोरणानुसार ठरविण्यात आले आहे. यात शेतकरी, शेतमजूर, कुक्कुटपालन करणारे पशुपालक, पशुपालक, मच्छिमार, मधमाशी, माळी, मेंढपाळ यांचा समावेश आहे. शेती आणि यासंबंधी व्यवसाय करणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Export Of Vegetables : भाजीपाला निर्यात करायचा आहे ? मग जाणून घ्या लागणारी आवश्यक कागदपत्रे

Silicon: ऊस उत्पादन वाढीसाठी सिलिकॉनचे महत्व, काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला ?

आता नियमित कर्जदारांच्या अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर, शेतकरी संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.