Sangli : कोरोनामुळे जनावरांचा उठलेला ‘बाजार’ पुन्हा पुर्वपदावर, आता निर्बंध मुक्तीनंतर होतेय कोट्यावधींची उलाढाल

कोरोनामुळे दोन वर्ष सर्वकाही ठप्पच होते. जनावरांची ना खरेदी ना विक्री. या परस्थितीचा परिणाम शेती व्यवसायावरही झाला आहेच. मात्र, कोरोनाचे निर्बंध उठताच दुसरीकडे बैलगाडा शर्यतीला अटी-नियमासह परवानगी मिळाली. यामुळे जनावरांच्या बाजारात तब्बल कोटींची उलाढाल झाली आहे. विशेषत: खिलारजोडीलाच अधिकची मागणी आहे. यात्रेत कोरोनाच्या निर्बध नंतर 10 ते 12 हजार खिलार जनावरांची आवक झाली होती.

Sangli : कोरोनामुळे जनावरांचा उठलेला 'बाजार' पुन्हा पुर्वपदावर, आता निर्बंध मुक्तीनंतर होतेय कोट्यावधींची उलाढाल
आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या यात्रेतील आठवडी बाजारात तब्बल 6 कोटींची उलाढाल झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 12:15 PM

सांगली : कोरोनाच्या (Corona) अनुशंगाने लादण्यात आलेले निर्बंध आता शिथील होत आहेत. त्यामुळे (Market) बाजारपेठेत पुन्हा नवचैतन्य निर्माण होत असून व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम (Weekly Animal Market) जनावरांच्या आठवडी बाजारावर सर्वाधिक झाला होता. पण आता सर्वकाही सावरताना दिसत आहे. कारण जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या यात्रेतील आठवडी बाजारात तब्बल 6 कोटींची उलाढाल झाली आहे. शिवाय बैलगाडा शर्यतीलाही अटी-नियमांसह परवानगी दिल्याने खिलार जोडीलाच अधिकची मागणी होत आहे. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे सिद्धनाथाच्या चैत्र यात्रा पार पडली. या यात्रेत कोरोनाच्या निर्बध नंतर 10 ते 12 हजार खिलार जनावरांची आवक झाली होती.

सात दिवसाच्या खरेदीत 6 कोटीची उलाढाल

कोरोनामुळे दोन वर्ष सर्वकाही ठप्पच होते. जनावरांची ना खरेदी ना विक्री. या परस्थितीचा परिणाम शेती व्यवसायावरही झाला आहेच. मात्र, कोरोनाचे निर्बंध उठताच दुसरीकडे बैलगाडा शर्यतीला अटी-नियमासह परवानगी मिळाली. यामुळे जनावरांच्या बाजारात तब्बल कोटींची उलाढाल झाली आहे. विशेषत: खिलारजोडीलाच अधिकची मागणी आहे. यात्रेत कोरोनाच्या निर्बध नंतर 10 ते 12 हजार खिलार जनावरांची आवक झाली होती. तर या सात दिवसात खरेदी विक्रीतून तब्बल सहा कोटीची उलाढाल झाली आहे.त्याचप्रमाणे जातिवंत खोडालाही बैलगाडा शर्यतीसाठी मागणी आहे. पाळीव बैलाला मागणी पाच लाखाची झाली. तर खोडाला मागणी सात लाखाची झाली.

खिलार बैलजोडी बाजारातील केंद्रबिंदू

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे सिद्धनाथाच्या चैत्र यात्रा पार पडली.मानदेश पट्ट्यात खिलार जनावरांचे चैत्र व पौशी या दोन यात्रा खरसुंडी गावच्या प्रसिद्ध आहेत. या पट्ट्या मधील चार तालुक्यातील खिलार जनावरांना राज्य व इतर राज्यात चांगली मागणी आहे. मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक मधून व्यापारी येत असतात.बैलगाडा शर्यतीवरील बंदी शासनाने उठवल्यामुळे खिलार जनावरांची मागणी दिवसेंदिवस चांगलीच वाढली आहे.परिणामी या खोंडांना मनाप्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

जातिवंत खोंडाला अधिकची मागणी

खरसुंडीच्या यात्रेमध्ये जनावरांचे आवक 10 ते 12 हजार झाले. सात दिवसात अडीच हजार जनावरांची विक्री झाली आहे. यातून 5 कोटी 75 लाखाची उलाढाल झाली आहे. यात्रेत जातिवंत खिल्लार वळूची संख्या 25 होती. वळू बैल पाळणारा शेतकरी वर्ग आटपाडी सांगोला व जत तालुक्यात ठराविक भागात आहेत. त्याचप्रमाणे जातिवंत खोडालाही बैलगाडा शर्यतीसाठी मागणी आहे. पाळीव बैलाला मागणी पाच लाखाची झाली. तर खोंडाला मागणी सात लाखाची झाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.