Kharif : वाह रे बहाद्दर..! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे, काय आहे अनोखा उपक्रम?

सबंध मृग नक्षत्र हे कोरडे गेले होते. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ तर दिली होतीच पण अल्पशा पावसावर जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ही ठेवलीच होती. पेरणीनंतरही पाऊस हा गायब आहे. जमिनीतील ओलीमुळे पिकांची उगवण तर झाली पण वाढ खुंटली अहे. तर काही ठिकाणी अधिकच्या पावसामुळे पिकांची उगवण झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

Kharif : वाह रे बहाद्दर..! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे, काय आहे अनोखा उपक्रम?
ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची मशागत
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:04 PM

अकोला : (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत आला आहे. आतापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे (Kharif Season) खरीप हंगाम धोक्यात आहे. शिवाय ज्या भागात शेतकऱ्यांनी पिकाचा पेरा केला आहे त्या क्षेत्रावरील पिके देखील आता माना टाकत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा प्रतिकूल स्थितीमध्ये एक शेतकरी पुत्रच शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडत आहे ज्याचे नाव श्रीकृष्ण थुट्टे असे आहे. चिखली तालुक्यातील भरोसा येथील थुट्टे यांनी शेतकऱ्यांना चांगलाच भरोसा दिला असल्याने आर्थिक संकट टळले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता (Tractor Cultivation) ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे ही मोहिम सुरु केली आहे. यामुळे दुबार पेरणी ज्यांना करायची आहे त्यांनी केवळ डिझेल टाकून शेती कामे करुन घेता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

पावसाने दडी दिल्याने दुबारचे संकट

सबंध मृग नक्षत्र हे कोरडे गेले होते. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ तर दिली होतीच पण अल्पशा पावसावर जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ही ठेवलीच होती. पेरणीनंतरही पाऊस हा गायब आहे. जमिनीतील ओलीमुळे पिकांची उगवण तर झाली पण वाढ खुंटली अहे. तर काही ठिकाणी अधिकच्या पावसामुळे पिकांची उगवण झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अधिकच्या पावसामुळे किंवा कमी पावसामुळे हे संकट ओढावले आहे त्यांना मोफत ट्रॅक्टर देऊन मदत केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होणार आहे.

शेतकरी आर्थिक संकटात

खरीप हंगामाच्या अनुशंगाने सुरु करण्यात आलेल्या पीककर्जाच्या लाभापासून अनेक शेतकरी हे वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे उसनवारी आणि साठवणूक केलेल्या धान्याची विक्री करुन खरीप पेरण्या करण्यात आल्या आहेत. असे असताना पुन्हा दुबारसाठी भांडवल कसे उभे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशा गरजू शेतकऱ्यांना का होईना या उपक्रमाची मदत व्हावी म्हणून श्रीकृष्ण थुट्टे यांनी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे ज्याची सबंध चिखली तालुक्यात चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना मदतीचा हात

निसर्गाच्या लहरीपणाचा सामना राज्यातील शेतकरी करीत आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी आवर्षणाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे. दुबार पेरणी करण्यासाठी पुन्हा बियाणाचा खर्च, पुन्हा परिश्रम आणि ट्रॅक्टर असा एकरी 8 हजार रुपये खर्च आहे. शेतकऱ्यांची अडचण आणि त्यांच्यावर ओढावलेली परस्थिती यामुळे थुट्टे यांनी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.