शेतकऱ्यांचा नाद खुळा : वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी अनोखी शक्कल, दुहेरी फायदा
रब्बी हंगामातील पिके ही जोमात असतानाच (Wildlife) वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होत आहेच पण शेतकऱ्यांचे कष्टही वाढले आहे. सध्याच्या वाढत्या गारठ्यात पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये न जाता (Nanded Disrtict) नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अनोखीच शक्कल लढवत आहेत.
नांदेड : आता वातावरण निवळले असून रब्बी हंगामातील पीके पुन्हा बहरु लागली आहेत. मात्र, शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. वातावरण पोषक असल्याने शेती कामांना गती आली आहे शिवाय मुबलक प्रमाणात पाणी असल्याने उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पाऊस, गारपिट तर मध्यंतरी वाढलेल्या थंडीमुळे पिकांचे संरक्षण करणे शेतकऱ्यांसाठी अव्हानात्मक होते. असे असताना योग्य वेळी औषध फवारणी करुन आता (Rabbi Season) रब्बी हंगामातील पिके ही जोमात असतानाच (Wildlife) वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होत आहेच पण शेतकऱ्यांचे कष्टही वाढले आहे. सध्याच्या वाढत्या गारठ्यात पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये न जाता (Nanded Disrtict) नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अनोखीच शक्कल लढवत आहेत. भीतीदायक आवाज रेकॉर्ड करून लाऊडस्पीकरवर रात्रभर लावण्यात येत आहेत. या वेगवेगळ्या आवाजामुळे वन्यप्राणी शेताकडे फिरकत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण तर होतच आहे पण शेतकऱ्यांची कष्टातूनही मुक्तता झाली आहे.
रब्बी हंगामातील पिकांची नासधूस
रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू, हरभरा ही पीके जोमात आहेत. यामध्ये रानडूकरांना खाण्यासारखे काही नसले तरी पिकांची नासाडी केली जाते. तर दुसरीकडे वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग लागवडीकडेही दुर्लक्ष केले आहे. कारण पेरणी पासून ते तोडणीपर्यंत पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना शेतावरच मुक्काम ठोकावा लागतो. दिवसेंदिवस रानडूकरांचा धोका वाढत आहे. शिवाय वनविभागाकडूनही कोणती कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील या भागात रोही, निलगायी आणि रानडुक्कर यांची संख्या मोठी असून रात्रीला शेतात येऊन ते पिकांची नासधूस करतात.
शेतकऱ्यांचे अनोखे जुगाड
दिवसभर शेतकरी हे शेतात असतात त्यामुळे या वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत नाही मात्र, रात्रीच्या वेळी शेतकरी घराकडे फिरकताच वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरु होतो. त्यामुळेच किनवट तालुक्यातील वनक्षेत्राच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी भीतीदायक आवाज रेकॉर्ड करून लाऊडस्पीकरवर रात्रभर लावले जातात. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला असून यामुळे वन्यप्राणी शेताकडे फिरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिकांचे रक्षण आणि शेतकऱ्यांचे कष्टही कमी झाले आहेत.
पीक संरक्षणाचे हे आहेत अन्य उपाय
विविध रंगांच्या साड्या पिकांच्या भोवती रोवल्या जातात. त्यामुळे रानडुकरांना शेतात कुणीतरी मानव असल्याचा भास होतो. त्यामुळे ते शेतात प्रवेश करण्यास भीतात. या पद्धतीचा जिथे मानवाची रेलचेल किंवा येणे-जाणे जास्त आहे, अशा भागात जास्त वापर होतो. तसेच रानडुकरांची दृष्टी आणि श्रवण हे दोन्हीही ज्ञानेंद्रीय ही कमकुवत असतात. याच ज्ञानेंद्रीयाच्या मदतीनेच ते आपले निवारा व अन्नाचा शोध घेत असतो. शेतात हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरविल्याने अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. मारठवाड्यात अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत.
संबंधित बातम्या :
Summer Season : उन्हाळी सोयाबीनचा नवा प्रयोग, कसा होईल यशस्वी?
रब्बी हंगामातील पिकांचे योग्य व्यवस्थापनच उत्पादनवाढीचा मार्ग, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?