वादळी वाऱ्यामुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान, जनावरांचे गोठे उद्धवस्त

आमगाव तालुक्यातील जामखारी आणि बिरसी गावाला मोठा फटका बसला आहे. एक मुलगा जखमी मात्र वादळी वाऱ्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही. लवकरात लवकर पंचनामे करावे शेतकरी आणि आमदारांची मागणी केली आहे.

वादळी वाऱ्यामुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान, जनावरांचे गोठे उद्धवस्त
gondia farmerImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 7:58 AM

गोंदिया : जिल्ह्याच्या आमगाव (Aamgaon) तालुक्यातील अनेक गावांना सायंकाळी आलेल्या अवघ्या वीस मिनिटाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक घरांची टीनाची छपरे उडाली, गावातील अनेकांची जनावरांची गोठे (unseasonal rain) कोसळली असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर या वादळी वाऱ्यामुळे एक लहान मुलं सुद्धा जखमी झालं आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतात कापणी (gondia farmer news) करून ठेवलेले धान हे हवेत उडाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे शेतातील धान पिकांबरोबर शेतातील अनेक झाडे कोलमडून पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील जामखारी या गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र या चक्रीवादळामुळं कुठलीही जीवितहानी झाली नाही. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहशराम कोरोटे यांनी जामखारी या गावाला भेट दिली असून तहसीलदारांना लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आमदार कोरोटे यांनी सांगितले.

सोलापूरच्या माढ्यातील भुताष्टे गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये जरीचंद्र व्यवहारे या शेतकऱ्याची दीड एकर केळीची बाग भुईसपाट झाली आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी व्यवहारे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मागच्या दिवसांपासून राज्यातील जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची डोकेदुखी चांगली वाढली आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.