Unseasonable Rain : मराठवाड्यावरही अवकाळीची अवकृपा, हंगामी पिकांचे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये बरसणाऱ्या अवकाळी पावसाने आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळविला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातारवरण आणि आता विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली आहे. रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी झाली असली तरी उन्हाळी कांदा, कलिंगड यासह इतर हंगामी पिकांचे नुकसान होत आहे.

Unseasonable Rain : मराठवाड्यावरही अवकाळीची अवकृपा, हंगामी पिकांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 9:25 AM

लातूर : गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये बरसणाऱ्या (Unseasonable Rain) अवकाळी पावसाने आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळविला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातारवरण आणि आता विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली आहे. (Rabi Season) रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी झाली असली तरी उन्हाळी कांदा, कलिंगड यासह इतर हंगामी (Crop Damage) पिकांचे नुकसान होत आहे. शनिवारी दुपारी उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, भूम तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली तर रविवारी पहाटेपासून लातूर, नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाली होती. खरीप हंगामपूर्व मशागतीसाठी हा पाऊस पोषक असला तरी कांद्यासह कलिंगडची नासाडी होत आहे. शिवाय पशूधन दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी मराठवाड्यावर चिंतेचे ढग कायम आहेत.

उन्हाळी कांद्याची नासाडी

मराठवाड्यातही उन्हाळी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. सध्या कांद्याची काढणी आणि छाटणीची कामे सुरु असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढून वावरात टाकलेल्या कांद्याचे तर नुकसान होतच आहे पण उभ्या पिकालाही फटका बसलेला आहे. याशिवाय उत्पादनवाढीच्या अनुशंगाने कलिंगडचे क्षेत्रही वाढले आहे. पण पावसाने कलिंगडचे नुकसान तर होत आहेच पण मार्केटमधील मागणीवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्याचा बेमोसमी पाऊस हा नुकसानीचाच ठरत आहे. मुख्य पिकांची काढणी झाल्यामुळे अधिकचे नुकासन टळले आहे.

वीज कोसळून पशूधनही दगावले

विजेच्या कडकडाटासह होत असलेल्या पावसाचा दुहेरी फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे पिकांचे तर नुकसान सुरुच आहे पण दुसरीकडे वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जनावरेही दगावली आहेत. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी आनंदराव भराटे यांनी शेतात बांधलेल्या गाईच्या अंगावर वीज कोसळली तर दुसरीकडे भूम तालुक्यातील रामकुंड येथे हनुमंत बोराडे यांच्या 2 गाईंच्या अंगावर वीज कोसळून त्याही दगावल्या आहेत. शेतकऱ्यांकडून आता मदतीची मागणी होत आहे.

आंबा फळपिकाचेही नुकसान

हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा फळपिकावर अवकाळीची अवकृपा राहिलेली आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असताना वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबागळ तर झालीच आहे पण आंबा जमिनीवर पडल्याने डागाळले आहेत. यामुळे उत्पादनावर आणि आंब्याच्या दर्जावरही परिणाम होणार आहे. एकंदरीत उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून शेतकरी प्रयत्न करीत आहे पण निसर्गाच्या लहरीपणाचा अडथळा ठरत आहे.

हिंगोलीत हळद प्रक्रियेत अडथळा

हिंगोलीसह जिल्ह्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद, कांदा बीज यासह इतर हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या हळद शिजवण्याचे काम सुरु आहे. मध्यंतरी वाढत्या उन्हामुळे हे काम शेतकऱ्यांना रात्रीतून करावे लागत होते तर आता अवकाळीमुळे यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. काढणी झालेली शिजवूनच प्रक्रिया केली जाते. पण सध्याच्या वातावरणामुळे या कामाला ब्रेक लागले आहे.

संबंधित बातम्या :

Loan Waiver : ‘नाबार्ड’ चा धक्कादायक अहवाल, कर्जमाफीमुळेच शेतकरी कर्जबाजारी, नेमकी काय आहेत कारणे ?

Pest Management: वेलवर्गीय पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा

Untimely rain : पश्चिम महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, विजेच्या कडकडाटासह गारपीट, पिकांना मोठा फटका

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.