AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अखेर ‘तो’ बरसलाच; रब्बीसाठी पोषक, खरिपाचे मात्र नुकसानच

नाही... नाही म्हणता अखेर तो बरसलाच अन हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला. ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अखेर बुधवारी सायंकाळी मराठवाड्यातील उस्मानाबाद, कळंब, लातूर, तर पश्चिम महाराष्ट्रातील बार्शी, माढा या तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे रब्बीची पेरणी अधिक सुखकर होणार आहे तर कापसाचे मात्र नुकसान झाले आहे.

...अखेर 'तो' बरसलाच; रब्बीसाठी पोषक, खरिपाचे मात्र नुकसानच
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 7:19 PM

लातूर : नाही… नाही म्हणता अखेर तो बरसलाच अन् (weather experts) हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला. ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अखेर बुधवारी सायंकाळी (Marathwada) मराठवाड्यातील उस्मानाबाद, कळंब, लातूर, तर पश्चिम महाराष्ट्रातील बार्शी, माढा या तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे रब्बीची पेरणी अधिक सुखकर होणार आहे तर खरिपातील कापसाचे मात्र नुकसान झाले आहे.

यंदाच्या हंगामात हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेले अंदाज खरे ठरले आहेत. दरम्यानच्या, काळात ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज देण्यात आला होता. त्यामुळे रब्बी हंगामात उर्वरित पेरणीला आणि होणाऱ्या पेरणीलाही हा पाऊस पोषक राहणार आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे शेत जमिनी ह्या आवळून आल्या होत्या. त्यामुळे पेरणीस अडचणी निर्माण झाल्या होत्या. पेरणी करूनही उगवणीचा धोका असल्याने पावसाची आवश्यकता होती. अखेर पावसाने हजेरी लावल्याने उर्वरित पेरण्याही लवकर होतील असा अंदाज आहे.

रब्बीसाठी पोषकच

यंदा सर्वकाही रब्बी हंगामासाठी पोषक ठरत आहे. हंगामाला सुरवात होण्यापूर्वीच सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची चिंता ही मिटलेली आहे. सर्व जलसाठे हे तुडुंब भरले असल्याने यंदा रब्बीच्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यातच मराठवाडा आणि पुणे विभागात पेरणी अधिकच्या क्षेत्रावर झाली आहे. त्यामुळे या पिकांची वाढ आता जोमात होणार आहे. तर मशागत करुन तयार असलेल्या क्षेत्रावरही आता पेरणी सुलभ झाली आहे.

खरिपातील कापसाला धोका

खरिपातील कापसाचे दर हे वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेचणीही लांबवली होती. शिवाय पावसाचा अंदाज वर्तवल्याने अनेक ठिकाणी खरेदी केंद्रही सुरु झालेले नव्हते. पण उत्पादन कमी आणि मागणी अधिकची असल्याने कापसाला सरासरी 8200 चा दर मिळत होता. खानदेशात तर परराज्यातील व्यापारी येऊन खरेदी करु लागले आहेत. अशातच मराठवाड्यात बुधवारी पावसाने थैमान घातल्याने आता कापसाच्या बोंडाची गळती होण्याचा धोका आहे. भाव वाढत असतानाच बोंड गळती झाली तर तोंडचा घास हिसकावल्यासारखे होणार आहे.

हवामान तज्ञांचा अंदाज खरा ठरला

ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराब डख यांनी वर्तवला होता. त्यानुसार 2 नोव्हेंबर रोजी ढगाळ वातावरण तर 3 नोव्हेंबरला सायंकाळी मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, भूम, परंडा या तालुक्यात तर मुसळधार पाऊस बरसला आहे.

संबंधित बातम्या :

वैज्ञानिक पध्दतीने खरबूजाची लागवड केल्यास भरघोस उत्पादन, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पोषक वातावरण

शेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय ? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या

सरकारच्या धोरणावरच ठरणार तुरीचे दर, शेतकऱ्यांना आशा हमीभाव केंद्राची

कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.