पीएम किसान योजनेतील निधीचा ‘असा’ हा उपयोग, अमरावतीमध्ये 22 कोटी 75 लाखांचा 10 हप्ता

केंद्र सरकारच्या माध्यमातून मध्यम आणि अल्पभूधारक शेतकरीच केंद्रस्थानी ठेऊन योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक असलेली पंतप्रधान किसान सन्मान योजना. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने या योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. वर्षभरात 6 हजार रुपये असे तीन हप्त्याच्या स्वरुपात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.

पीएम किसान योजनेतील निधीचा 'असा' हा उपयोग, अमरावतीमध्ये 22 कोटी 75 लाखांचा 10 हप्ता
पीएम किसान सन्मान योजना
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 10:20 AM

स्वप्नील उमप : अमरावती : केंद्र सरकारच्या माध्यमातून मध्यम आणि अल्पभूधारक (Farmer Center) शेतकरीच केंद्रस्थानी ठेऊन योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक असलेली (PM Kisan Sanman Yojna) पंतप्रधान किसान सन्मान योजना. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (Central Government) केंद्र सरकारने या योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. वर्षभरात 6 हजार रुपये असे तीन हप्त्याच्या स्वरुपात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. मात्र, 10 हप्त्याला अधिकचे महत्व होते. कारण ऐन गरजेच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. रब्बी हंगामातील शेती कामासाठी याचा उपयोग झाला आहे. नुकतेच वातावरण निवळले असून शेती मशागत आणि काही ठिकाणी पेरणीची कामे सुरु असतानाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 13 हजार 778 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झालेला आहे. शिवाय अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर यावेळचा 10 हप्ता जमाही झालेला नाही. मात्र, केंद्र सरकारच्या योजनेचा निधी सत्कर्मी लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

22 कोटी 75 लाख रुपये खात्यावर वर्ग

पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गतचा 10 हप्ता गतमहिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या 10 हप्त्याची चर्चा होती. मात्र, नववर्षाचे मुहूर्त साधत केंद्र सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 13 हजार 778 शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. याकरिता सरकारला 22 कोटी 75 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे लागले होते. केंद्र सरकारने 2019 पासून ही योजना सुरू केली आहे .या योजनेमध्ये या शेतकऱ्याच्या नावे सातबारा आहे अशा पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

30 सप्टेंबरपूर्वीच नोंदणी करणाऱ्यांना योजनेचा लाभ

योजनेतील लाभाकरिता ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली. अशा शेतकऱ्यांना योजनेचे दोन हप्ते मिळाले आहेत. या योजनेत अनेक अपात्र शेतकरी लाभ मिळवीत असल्याचे निदर्शनात आल्याने शासनाने योजनेच्या निकषात थोडा बदल केला. त्यामुळे आता 11 व्या हप्त्यासाठी नवी नियामावली जारी करण्यात आली आहे. आता 11 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा होणार असल्याचे अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात आले आहे.

अखेर योजनेचा उद्देश साध्य

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळत असले तरी 10 हप्ता ऐन गरजेच्या दरम्यान मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरण्या आणि मशागतीसाठी याचा उपयोग झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य झाल्याची भावना आहे.

संबंधित बातम्या :

Grape : शेतकऱ्यांची मंदीत संधी, संकटावर मात करुन अखेर द्राक्षांची निर्यात

वेध ड्रोन शेतीचे, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 100 ड्रोन कृषी सेवा केंद्र उभारण्याचा निर्धार, आजपासून कार्यशाळाही

Rabi Season: आपला शेतकरीही आता कमर्शियल, पारंपरिक पिकांना डावलून कडधान्यावरच भर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.