Tomato Rate Today : टोमॅटोचे दर उतरले, तरी सुध्दा किलोचा दर शंभरच्या रुपयांच्या पुढे
अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेचं वाढले आहेत. कित्येक दिवसांनी भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्र : सध्या बाजारात भाज्यांची (Vegetables Rate) आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत. सामान्य लोकांच्या जेवणातून अनेक गोष्टी मागच्या महिन्यात गायब झाल्या होत्या. टोमॅटो २०० रुपये किलोच्या पुढे विकला गेला. टोमॅटोचे दर इतके वाढले की, केंद्र सरकारने टोमॅटो (Tomato Rate Today) खरेदी करुन कमी दरात विकला. साधारण ४५ दिवसांनंतर भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर मिरच्याचा दर निम्म्यावर आला आहे. या महिन्यात अजून टोमॅटोचा दर कमी होईल असा विश्वास भाजीपाला (maharashtra Vegetables Rate) किरकोळ विक्रेत्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दर कमी झाल्यामुळे सामान्य लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
महिनाभरात हे दर पुन्हा कमी होतील—
शहरात तब्बल ४५ दिवसांनंतर भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला. मिरची, गिलके, कारले, मेथी, कोथिंबीरचे दर कमी झाले आहे. विशेषता गेल्या पंधरवड्यात १६० ते १८० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या टोमॅटोचे दर सरासरी ६० रुपयांनी कमी होऊन १०० ते १२० पर्यंत खाली आले आहेत. महिनाभरात हे दर पुन्हा कमी होतील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.
या कारणामुळे टोमॅटो महाग झाला
अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं होतं. त्याचबरोबर जून महिन्यात वेळेत पाऊस न झाल्यामुळे भाजीपाल्यांचे दर कैकपटीने वाढले होते. टोमॅटो महाग झाल्यामुळे केंद्र सरकारने कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यातून टोमॅटोची खरेदी केली. त्यानंतर तोचं टोमॅटो देशात ज्या शहरात अधिक किंमत आहे अशा ठिकाणी विकला.
पुढच्या दोन महिन्यात देशात कमी प्रमाणात पाऊस होणार असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. त्यामुळे मध्यम स्वरुपाच्या पावसाचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल.