TOMATO RATE TODAY : टोमॅटोचे दर घसरल्याने सामान्यांना दिलासा, जाणून घ्या आजचा दर

Vegetables Rate : सध्या भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कडधान्याचे दर वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहे. आजचा टोमॅटोचा दर सामान्यांच्या आवाक्यात आहे.

TOMATO RATE TODAY : टोमॅटोचे दर घसरल्याने सामान्यांना दिलासा, जाणून घ्या आजचा दर
Tomato Rate DownImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 12:03 PM

महाराष्ट्र : सध्या महाराष्ट्रात टोमॅटोचे दर (tomato rate) उतरत असल्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. मागच्या कित्येक दिवसांपासून सामान्य माणसांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला होता. टोमॅटोचे दर २०० रुपयेच्या पलिकडे गेल्यानंतर लोकांनी टोमॅटो खाणं बंद केलं. सध्या सगळ्याचं भाजीपाल्यांचे दर (Vegetables Rate) कमी झाले आहेत. भाजीपाल स्वस्त झाल्यानंतर आता कडधान्याचे दर वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे. तुरीचा दर सध्या 11 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांकडील (farmer news)तूर संपल्यामुळे तुरीचा दर वाढला असल्याची शेतकऱ्यांची चर्चा आहे. जोपर्यंत तुरीची आवक बाजारात होत नाही, तोपर्यंत तुरीचा दर असाच राहणार आहे.

तूर संपताच तुरीचा दर वाढला

अमरावतीत तुरीचे दर 11 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांजवळील तूर संपताच तुरीचा दर वाढला असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. बाजारपेठेत तुरीची आवक कमी झाल्याने व मागणी वाढल्याने तुरीच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. मागील दहा दिवसात प्रति क्विंटल दीड ते दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र तुरीचा दर वाढीचा शेतकऱ्यांना फार फायदा होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

टोमॅटोचे दर घसरल्याने सामान्यांना दिलासा

वाशिमच्या भाजी बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचा दर घसरला आहे. 80 रुपये प्रति किलोने टोमॅटो विकला जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटो 200 रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता. मात्र सद्यस्थितीत टोमॅटोचे दर सामान्यांच्या आवाक्यात आल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

वाशिम बाजारात विकल्या जात असलेल्या भाज्यांचे दर

वांगी – 40, भेंडी – 40, फुल कोबी – 60, पानकोबी – 40, कारली – 60, दोडकी – 60, गाजर – 60, मेथी जुडी – 15, पालकजुडी – 10, कोथिंबीर जुडी – 05 असे पालेभाज्यांचे दर सध्या वाशिमच्या बाजारात पाहायला मिळत आहेत.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. कांद्याचा बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा बाजार आणला जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने ४० टक्क्याने भाव ढासळले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. ४२ हजार पिशव्यांची मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक सुरु आहे. ३० ते ३२ रुपये कांद्याला दर मिळत होता. सध्या तोचं दर १७ ते २२ रुपयापर्यंत आला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.