Weather Update: मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह पावसाचा IMD चा इशारा, मराठवाडा विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग
मुंबई वेधशाळेनं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Weather Update IMD Mumbai
मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई वेधशाळेने पुढील तीन तासात नांदेड, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि वीज देखील कोसळू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यात सकाळपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. गडचिरोलीमध्येही पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. (Weather Update K S Hosalikar said IMD Mumbai issue alert thunderstorm accompanied with lightning and light rain various places of Maharashtra)
परभणीत मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग
परभणी जिल्ह्यातही मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. परभणी शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. परभणी, पूर्णा, पाथरी, सेलू, तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
गडचिरोलीत पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान अर्ध्या तासाचा पाऊस झाला. या एका आठवड्यात तीनदा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या कामात मोठी मदत झालेली आहे. तापमान कमी झाल्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागलेले आहेत. पुढच्या आठवड्यात ही गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Nowcast warning issued at 1000 Hrs IST dated 04/06/2021 Thunderstorm accompanied with lightning and light rain likely to occur at isolated places in the districts of Nanded,Parbhani,, during next 3 hours. -IMD MUMBAI pic.twitter.com/vAnJDlFabv
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2021
बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात
बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला आज दमदार सुरुवात झालीय. बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा आनंदात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मशागतीच्या कामाला वेग येणार आहे.
हिंगोलीतही पावसाला सुरुवात
हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच्या ढगाळ वातावरणानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झालीय. पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.
सांगलीत तीन महिला वाहून गेल्या
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात काल सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जत तालुक्यात काही ओढे तुडुंब भरून वाहू लागले होते. सायंकाळी शेतीमधील काम झाल्यावर 7 महिला या ओढ्यातून वाट काढत जात होत्या. यावेळी तीन महिला वाहून गेल्या. मात्र, या महिला घटनेतून बचावल्या असून सुखरुप आहेत.
संबंधित बातम्या:
(Weather Update K S Hosalikar said IMD Mumbai issue alert thunderstorm accompanied with lightning and light rain various places of Maharashtra)