गाय म्हैस विकायचीय, विकत घ्यायचीय, मग ही वेबसाईट आहे ना! शेतकऱ्यांनो ट्राय करा!

आता गाय, म्हैस, बैलही ऑनलाईन विकली जाऊ लागली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही वस्तू ऑनलाईन खरेदी करता, तसंच आता गाय, म्हैस, बैलही ऑनलाईन खरेदी करु शकणार आहात.

गाय म्हैस विकायचीय, विकत घ्यायचीय, मग ही वेबसाईट आहे ना! शेतकऱ्यांनो ट्राय करा!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 3:28 PM

मुंबई : तुम्ही अनेक वस्तू ऑनलाईन खरेदी करत असाल किंवा तुमचं एखादं प्रॉडक्ट ऑनलाईन विकतही असाल. पण आता गाय, म्हैस, बैलही ऑनलाईन विकली जाऊ लागली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही वस्तू ऑनलाईन खरेदी करता, तसंच आता गाय, म्हैस, बैलही ऑनलाईन खरेदी करु शकणार आहात. गाय आणी म्हशीची किंमत साधारणपणे तिचं वेतं कितवं आहे आणि ती दूध किती लीटर देते, यावरुन ठरते.(Website now for buying and selling cows and buffaloes)

सर्वसाधारणपणे गाय, म्हशीची किंमत किती?

सर्वसाधारणपणे गाय आणि म्हशीची किंमत ही त्यांच्या दुधावर आणि वेतं कितवं आहे, यावरुन ठरते. साधारणपणे 10 लीटर दूध देणारी गाय जवळपास 65 ते 80 हजार रुपयांना विकली जाते. तिच्या वेतावर ही किंमत कमी-जास्ती होते. जास्ती वेतं झालेल्या म्हशीची किंमत कमी मिळते.

साधारणपणे म्हैस किती दूध देते?

एक म्हैस एक दिवसात किती दूध देते हे त्या म्हशीच्या जातीवर अवलंबून असते. म्हशीची जात कोणती आहे त्यावरुन ती म्हैस किती दूध देते हे लक्षात येतं. मुरा म्हैस जास्ती दूध देते. तर अनेक म्हशी या 25 लीटरपर्यंत दूध देतात. तर सामान्य म्हशी या 7 ते 8 लीटर दूध देतात.

जनावरांच्या विक्रीसाठी खास वेबसाईट

जनावरांच्या विक्रीसाठी animall.in या वेबसाईटची सुरुवात करण्यात आली आहे. या वेबसाईटवर सर्व जातींच्या गायी, म्हशींची माहिती तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर या वेबसाईटवर तुम्ही जनावरांची खरेदी-विक्रीही करु शकता.

वेबसाईटवर कोणत्या सुविधा ?

animall.in या वेबसाईटवर तुम्ही जनावरांची खरेदी-विक्रीही करु शकता. त्याचबरोबर पशुवैद्यकीय डॉक्टरांशीही सल्लामसलत करु शकता. या वेबसाईटवर अनेक कॉन्टेस्टही ठेवण्यात आले आहेत. त्यात भाग घेऊन तुम्ही पैसेही मिळवू शकता. यासह वेबसाईटवर दूधाचा हिशोब ठेवणं, गाय-म्हशीची किंमत माहिती करुन घेणं, डॉक्टरशी बोलण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

वेबसाईटवर कशी होते खरेदी-विक्री?

या वेबसाईटवर तुम्ही गाय, म्हैस, वासरु, बैल, आदी जनावरांची खरेदी-विक्री करु शकता. तुम्हाला ही जनावरं अनेक फिल्टर्स लावून खरेदी करता येऊ शकते. त्याचबरोबर दूध देण्याची क्षमता, अनेक जातींच्या गाय, म्हशीची पडताळणी करुन तुम्ही जनावरं विकत घेऊ शकता. जनावरांच्या मालकाची माहितीही या वेबसाईटवर असते. तुम्हाला आपल्याकडील जनावरांची विक्री करायची असेल तर त्यांची सर्व माहिती तुम्हाला द्यावी लागेल. त्यासाठी तुमच्याकडील गाय, म्हशीचा फोटो आणि त्याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल. हे सर्व करत असताना तुम्हाला या वेबसाईटवर तुमचं अकाऊंटही ओपन करावं लागेल.

संबंधित बातम्या :

Agriculture Budget 2021: मोदी सरकारनं शेती क्षेत्रासाठी खजिना उघडला? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार?

सातारच्या पठ्ठ्याची अभिमानास्पद कामगिरी, स्वप्नवत ऊस भरणी मशीन वास्तवात साकारली

Website now for buying and selling cows and buffaloes

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.