पीक उगवण्यापूर्वीच करा तणनियंत्रण, उत्पादनात वाढ अन् जोमात बहरतील पिके

पेरणीपुर्व मशागत करुनही आता तणवाढीच्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. पिकांपेक्षा अधिकचे तणच येत असल्याने याचा अप्रत्यक्ष उत्पादनावरही परिणाम होत आहे. त्यामुळे पीक उगवण्यापूर्वीच याचा बंदोबस्त केला तर अधिकचे फायद्याचे राहणार आहे.

पीक उगवण्यापूर्वीच करा तणनियंत्रण, उत्पादनात वाढ अन् जोमात बहरतील पिके
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 7:20 AM

लातूर : पेरणीपुर्व मशागत करुनही आता तणवाढीच्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. पिकांपेक्षा अधिकचे (weed control,) तणच येत असल्याने याचा अप्रत्यक्ष उत्पादनावरही परिणाम होत आहे. त्यामुळे पीक उगवण्यापूर्वीच याचा बंदोबस्त केला तर अधिकचे फायद्याचे राहणार आहे. आता मशागतीसाठी मजूरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे पिकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा लागणार आहे. हा प्रयोग केला तरच (Rabi season) रब्बी हंगामात उत्पादनात वाढ होणार आहे.

तसे पाहायला गेले तर एकात्मिक त्यांना नियंत्रणाच्या विविध प्रकारच्या पद्धती आहेत.यामध्ये पेरणीपूर्व मशागत, लागवड करतानाची मशागत, पिकांची आंतरमशागत, तणनाशकांचा वापर इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

अशी करा तणनाशकाची निवड

तणाचे व्यवस्थापन हा एक उत्पादनवाढीच्या अनुशंगाने महत्वाचा घटक आहे. आतापर्यंत पीक उगवून आल्यावर तणाच्या नियंत्रणाबाबत उपाययोजना केली जात होती. पण आता पीक उगवण्यापूर्वीच तणाचे नियंत्रण केले जात आहे. पेरणीनंतर पीक उगवणी पुर्वी एकदल पिकांमध्ये ऍट्राझीन, द्विदल पिकासाठी पेंडीमेथिलिन ही तणनाशके वापरावीत. तर उभ्या पिकातील तणनियंत्रणासाठी सुद्धा तणनाशकांचा वापर करता येतो. मात्र त्यासाठी पिकांचा वर्ग माहीत असणे आवश्यक आहे. उभ्या पिकांमध्ये तणनाशकांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी तने दोन ते चार पानावर असतांना फवारणी करावी.

पिकनिहाय तणनाशके

तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. तर फवारणीसाठी पाठीवरील साधा फवारणी पंप वापरावा. फवारणीचाअंश पिकावर जाऊ नये यासाठी वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी. हरभरा हे पीक उगवण्यापूर्वी पेंडीमेथिलिन 2.5 लिटर हे तणनाशक प्रति हेक्टरी 300 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. फवारणी केल्यानंतरही सहा आठवड्याने खुरपणी ही शेतकऱ्यांना करावीच लागणार आहे.

मका- वेळ- पिक उगवणीपुर्व ऍट्राझीन (50 डब्ल्यू पी ) 1000 ग्रॅम हे 300 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर क्षेत्रावरील पिकावर फवारणी करता येणार आहे. रब्बी हंगामाती कांद्याही उगवण्यापूर्वी ऑक्सीफ्लोरफेन एक लिटर किंवा पेंडीमेथिलिन 2.5 लिटर हे 300 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टरावरील क्षेत्रावर फवारणी करावी लागणार आहे. मात्र, फवारणी करुनही सहा आठवड्यांनी पुन्हा कांद्याची खुरपणी ही करावीच लागणार आहे.

करडई- यंदा करडईच्या क्षेत्रामध्ये वाढ होताना पाहवयास मिळत आहे. करडई उगवण्यापूर्वी ऑक्सिफ्लोरफेन एक लिटर हे तणनाशक 300 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टरवरील पिकावर फवारणी करता येणार आहे. यामुळे पिक उगवून येईपर्यंत तण नियंत्रणात येईल पण पुन्हा पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी ही करावीच लागणार आहे.

काय होईल फायदा?

पेरणीपूर्व फवारणीचे प्रमाण आता वाढत आहे. कारण पूर्वी पिकांची उगवण होण्यापूर्वीच तण वाफत होते. त्यामुळे खुरपणीवर अधिकचा खर्च करुनही पिक जोमात येत नव्हते. पण आता पेरणीपुर्वच तणनाशकाची फवारणी केली जात आहे. यामुळे अधिकचा खर्च होत असला तरी पिकांची वाढ जोमाने होते. शिवाय पेरणीनंतर काही काळ खुरपणी करण्याची आवश्यकता भासत नाही. हे तणनाशकाचे फायदे आहेत.

संबंधित बातम्या :

FRP : मराठवाड्यातील 13 साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार, काय आहेत उच्च न्यायालयाचे आदेश?

बाजार समितीचा इशारा अन् कारवाईही, अनाधिकृत कापूस खरेदी व्यापाऱ्यांना भोवली

फळांच्या ‘राजा’ लाही अवकाळीचा तडाखा , हापूसचा हंगाम यंदा केवळ तीनच महिने

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.