Sugarcane : ऊस गाळपात पश्चिम महाराष्ट्र अव्वलस्थानी, ‘विठ्ठल’ च्या दोन युनिटचे गाळप 30 लाख मेट्रीक टन
यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न राज्यात गाजत आहे. असे असताना शेतकऱ्यांना फडातील उभ्या उसाबाबत चिंता असताना त्यांना धीर देणेच हेच महत्वाचे आहे. प्रशासकीय स्तरावर प्रयत्न होत असले तरी अंमलबजावणी करणे हे साखर कारखान्यांच्या हातामध्येच आहे. त्यामुळेच कारखान्याची भूमिका स्थानिक पातळीवर महत्वाची आहे. मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
माढा : यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम सुरु होऊन 7 महिन्याचा कालावधी लोटला तरी अजून हंगाम सुरुच आहे. वाढत्या क्षेत्रामुळे यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. पण याची तीव्रता (Western Maharashtra) पश्चिम महाराष्ट्रात कमी आहे. कारखाना प्रशासनाचे नियोजन आणि (Sugar Factory) उसाच्या नोंदीनुसार तोड यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे. देशात ऊस गाळपात आघाडीवर असलेल्या विठ्ठलराव शिंदे या कारखान्याने आपले वेगळेपण यंदाही कायम ठेवले आहे. विक्रमी गाळप तर झालेच आहे पण कार्यक्षेत्र सोडून या भागातील एकाही शेतकऱ्याच्या उसाचे टिपरु हे शिल्लक ठेवणार नसल्याचे आश्वासन कारखान्याचे चेअरमन तथा आ. बबनराव शिंदे यांनी दिले आहे. हंगाम अतिम टप्प्यात असला तरी शेवटच्या शेतकऱ्याचा उसतोड झाल्याशिवाय धुराडी बंद होणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
युनिट 2 गाळप 30 लाख मेट्रीक टनाचे
माढा तालुक्यात विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे 2 युनिट आहेत. शिवाय या भागात वाढते उसाचे क्षेत्र यामुळे क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप हे ठरलेले आहे. देशात सर्वाधिक उसाचे गाळप हे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे राहिलेले आहे. यंदाही गाळपात सातत्य राहिल्याने पिंपळनेर आणि कुर्डवाडी येथील कारखान्यातून 30 लाख मेट्रीक टनाचे उत्पादन झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी हे दोन्ही साखर कारखाने हे वरदान ठरले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाची वेळेत तोड झाल्याने संभाव्य नुकसान टळले आहे.
उसाच्या फडात टिपूरही राहणार नाही
यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न राज्यात गाजत आहे. असे असताना शेतकऱ्यांना फडातील उभ्या उसाबाबत चिंता असताना त्यांना धीर देणेच हेच महत्वाचे आहे. प्रशासकीय स्तरावर प्रयत्न होत असले तरी अंमलबजावणी करणे हे साखर कारखान्यांच्या हातामध्येच आहे. त्यामुळेच कारखान्याची भूमिका स्थानिक पातळीवर महत्वाची आहे. मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम येथील कारखान्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे सभासदांच्या उसाची तर तोड झालीच आहे पण लगतच्या भागातील उस तोडणीची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी घेतली आहे..
लोकप्रतिनिधींचा शेतकऱ्यांना आधार
ऊस गाळपाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनीधींचीही आहे. शेतकऱ्यांच्या समस्या ओळखून आ. बबनराव शिंदे यांनी शेतकऱ्यांनी गाळपाअभावी नुकसान होणार नाही असे आश्वासन तर दिलेच पण त्याची पूर्तताही केली. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निपटारा होत असून साखर कारखान्याचे गाळपही देशात अव्वल क्रमांकावर आहे.