रब्बीचा पेरा झाला आता आंतरमशागतीचे महत्व जाणून घ्या..!

पेरणीनंतर नियोजन करावे लागते ते तण नियंत्रणाचे. कारण बदलत्या वातावरणामुळे पिकापेक्षा तणाचीच उगवण लवकर होते. सध्या पिकाच्या उगवणीपुर्वीच तणाचे नियंत्रण केले जाते मात्र, त्यानंतरही आंतरमशागत ही करावीच लागते. यामुळे पीके जोमात बहरतात तर उत्पादनातही वाढ होते. मात्र, योग्य वेळी मशागत करणे आवश्यक आहे.

रब्बीचा पेरा झाला आता आंतरमशागतीचे महत्व जाणून घ्या..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 8:23 AM

लातूर : पेरणीनंतर नियोजन करावे लागते ते (Weed control) तण नियंत्रणाचे. कारण बदलत्या वातावरणामुळे पिकापेक्षा तणाचीच उगवण लवकर होते. सध्या पिकाच्या उगवणीपुर्वीच तणाचे नियंत्रण केले जाते मात्र, त्यानंतरही आंतरमशागत ही करावीच लागते. यामुळे पीके जोमात बहरतात तर उत्पादनातही वाढ होते. मात्र, योग्य वेळी (crop cultivation) मशागत करणे आवश्यक आहे. मशागतीच्या पध्दती बदलल्या असल्या तरी उद्देश मात्र, उत्पादनवाढीचाच आहे.

रानबांधणी केल्यानंतर पेरणी झाली की उभ्या पिकात करावयाची मशागतीची कामे म्हणजेच आंतरमशागत, आंतर मशागतीमध्ये नांग्या भरणे , विरळणी करणे , वरखते देणे , कोळपणी , खांदणी करणे इत्यादी कामांचा समावेश होतो .

आंतरमशागतीचे फायदे

* तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. माती भुसभुशीत होते. एवढेच नाही तर जमिनितील ओलावा टिकवण्यास मदत होते . ज्यामुळे मातीचा वरचा थर सैल होऊन मातीला पडलेल्या भेगा बुजल्या जातात. त्यामुळे बापपीभवनाचा वेग कमी होतो. आच्छादकांचा वापर केल्यामुळे जमीन कमी तापते आणि बाष्पीभवनाद्वारे होणारी पाण्याची कमतरता कमी होते.

* आंतरमशागतीमुळे पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते त्यामुळे पिकाबरोबरच जमीननीतील सूक्ष्मजीवांचा कार्यसाठीही होतो. आंतरमशागतीमुळे नको असलेली मुळांची छाटणी होते तर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो

* पिकामधील अंतर योग्य राखले जाते. खांदणी करून पिकाच्या बुंध्याकडच्या भागाला मातीची भर घालून आधार दिला जातो. त्यामुळे मुळे मजबुत होतात. ऊस, आले, हळद या पिकांना अधिक प्रमाणात अशाप्रकारे मशागत केली जाते

आंतरमशागतीचे विविध प्रकार

नांग्या भरणे : लागडीनंतर बऱ्याच वेळा उगवण नीट न झाल्याने वाफ्यात किंवा साऱ्यात रिकामी जागा दिसते. यावेळी टोकण पद्धतीने रोपांची लागवड केली जाते. साधारणतः पेरणीनंतर 8 -10 दिवसात नांग्या भराव्या लागतात. जेणेकरून आधीच्या व नंतर लावलेल्या पिकाच्या वाढीत जास्त फरक पडत नाही. यामुळे रोपांची हेक्टरी संख्या योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते .

विरळणी : ही पध्दत नांग्या भरण्याच्या अगदी उलटी आहे. दाट पेरणीमुळे पिकांना वाढीसाठी योग्य अंतर राहत नाही. त्यामुळे पिक हे काढून टाकले जाते. पेरणीनंतर 10 – 12 दिवसांनी व 22 – 25 दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी लागते. या पध्दतीमुळे दोन रोपातील अंतर योग्य राहते .

कोळपणीः कोळपणीचे फायदे म्हणजे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. मातीतील ओलावा टिकण्यास मदत होते शिवाय वरखते मातीत नीट मिसळून घेता येतात. मातीच्या वरच्या थरात हवा खेळती राहण्यास मदत होते. तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकाच्या प्रकारानुसार 2 ते 3 वेळा कोळपणी करावी लागते. पेरणीनंतर दुसऱ्या आठवड्यापासून 5 – 6 व्या आठवड्यापर्यंत कोळपणी करावी . कोळणीसाठी विविध प्रकारची पिकानुसार सुधारित कोळपी उपलब्ध आहेत.

खुरपणी: ही पध्दत पारंपारिक आहे पण तेवढीच महत्वाची. तणामुळे पिकाला अन्नद्रव्य, पाण्याची कमतरता भासते. कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे उत्पादनात घट येते. त्यामुळे खुरपणी करुन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो तर पीक तणविरहित ठेवणे सोपे होते. साधारणतः 2 ते 3 खुरपण्या पिकानुसार आणि तणांच्या प्रादुर्भावानुसार आवश्यक आहे. वेळेअभावी अथवा मजुरांअभावी खुरपणी शक्य नसल्यास रासायनिक तणनियंत्रके वापरून तणांचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

संबंधित बातम्या :

Farmer Suicide : सन 2020 मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?

करडई 10 हजारावर तरीही शेतकऱ्यांचा भर हरभाऱ्यावरच, काय आहेत कारणे?

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.