कापूस विक्री करताय ? ही काळजी घ्या अन्यथा होईल फसवणूक ; काय आहे बाजार समित्यांचे अवाहन?
पावसामुळे कापूस विक्रीला उशीर झाला आहे. मात्र, विक्रीच्या दरम्यान शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे अवाहनच येथील बाजार समित्यांना करावे लागत आहे. एकतर बाजार समितीच्या परिसरात व्यापाऱ्यांनी शेतीमालाची खरेदीच करु नये असे ठणकावून सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांनीही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ शकते.
बुलडाणा : पावसामुळे कापूस विक्रीला उशीर झाला आहे. मात्र, विक्रीच्या दरम्यान शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे अवाहनच येथील बाजार समित्यांना करावे लागत आहे. एकतर बाजार समितीच्या परिसरात व्यापाऱ्यांनी शेतीमालाची खरेदीच करु नये असे ठणकावून सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांनीही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ शकते.
परवाना नसतानाही कापसाची खरेदी सर्रास सगळीकडे होत असते. मात्र, यामधून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे अधिक प्रमाण असते. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी याचा अनुभव घेतातच. त्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच कापसाची विक्री करण्याचे सांगण्यात येत आहे.
अन्यथा कायदेशीर कारवाई
कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीचा परवाना गरजेचा आहे. मात्र, आवक सुरु झाली की, जो-तो दुकान थाटून खरेदीसाठी बसत असतो. त्यामुळे शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने तर अधिकृत व्यापाऱ्यांची यादीच प्रसिध्द केली आहे. शेतकऱ्यांनी याची तपासणी करुनच कापसाची विक्री केली तर फायद्याचे राहणार आहे. जर व्यवहारात काही अडचणी निर्माण झाल्या तरी बाजार समितीला हस्तक्षेप करता येतो. मात्र, परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांना काही बोलण्याचाही अधिकार नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. मात्र, परवाना नसताना कापसाची खरेदी केल्याचे निदर्शनास येताच कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत बाजार समितीने दिले आहेत.
शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला 8 हजार रुपये क्विंटलला दरही मिळत आहे. असे असतानाही उत्पादनात घट झाल्याने मागणी वाढलेली आहे. परंतू, व्यापारी आता गावागावत जाऊनही खरेदी करु लागले आहेत. अशा परस्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बाजार समितीच्या आवारातीलच व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री करणे गरजेचे आहे. शिवाय अशाप्रकारे खरेदी करणारे व्यापारी निदर्शनास आल्यावर बाजार समितीच्या सभापतींना त्याची माहिती देण्याचे अवाहनही करण्यात आले आहे.