Silicon: ऊस उत्पादन वाढीसाठी सिलिकॉनचे महत्व, काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला ?

ऊस लागवडीपासून शेतकऱ्यांना चिंता असते ती उत्पादन वाढीची. याकरिचा एक ना अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. कारण उताऱ्यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. ऊस उत्पादन वाढीसंदर्भात राहूरी कृषी विद्यापीठाने केलेल्या सूचना आता शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहेत. सिलिकॉन ह्या अन्नद्रव्यामुळे ऊसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

Silicon: ऊस उत्पादन वाढीसाठी सिलिकॉनचे महत्व, काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 7:10 AM

पुणे : ऊस लागवडीपासून शेतकऱ्यांना चिंता असते ती उत्पादन वाढीची. याकरिचा एक ना अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. कारण उताऱ्यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. (Sugarcane crop) ऊस उत्पादन वाढीसंदर्भात (Agricultural University) राहूरी कृषी विद्यापीठाने केलेल्या सूचना आता शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहेत. सिलिकॉन ह्या अन्नद्रव्यामुळे ऊसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे. सिलिकॉन हे अन्नद्रव्य हे इतर पिकांच्या तुलनेत ऊसासाठी उपयोगी आहे. शोषलेले हे सिलिकॉन वनस्पती (silicic acid) सिलिसिक आम्लाच्या स्वरूपात विसरण व प्रवाही वस्तुमान पद्धतीने शोषून घेऊन त्याची साठवण खोडात व पानात करतात. ऊस पिकाचा विचार केला तर हे पीक हेक्‍टरी 700 किलो सिलिकॉन शोषून घेते.

ऊसाला सिलिकॉन चे फायदे

पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी उपयुक्त- सिलिकॉन हे वनस्पतीच्या पानांच्या पेशीभित्ति वर सिलिका जेल या स्वरूपात साठून राहते. त्यामुळे त्याचा पानांवर जाड थर निर्माण होतो. या साचलेल्या थरामुळे वनस्पतींमध्ये यांत्रिक शक्ती निर्माण होऊन वनस्पती सरळ वाढतात. त्यामुळे त्यांचे जमीनीवर लावण्याचे प्रमाण कमी होते. पाने सरळ वाढल्याने एकमेकांचे सावली पानांवर पडत नाही. या सर्वांमुळे प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत मदत होऊन पिकाची उंची, खोडा ची जाडी व फुटव्यांची संख्या वाढते. ऊस पिकात वाढतो साखरेचा गोडवा वाढतो. एवढेच नाही तर त्याची साठवण होऊन त्याच स्वरूपात ती टिकून राहते यासाठी सिलिकॉन चा उपयोग होतो.

जमिनीची सुपीकता

जमीन ही पिकांच्या बाबतीत मुळांची वाढ, अन्नद्रव्यांचा पुरवठा, हवा व पाणी यांचे योग्य संतुलन करते. सिलिकॉनयुक्त खतांचा पुरवठा केल्यास यातील सिलिसिक आम्ल जमिनीच्या आरोग्यावर अनुकुल परिणाम करते. जमीन भुसभुशीत होऊन मुळांची वाढ होण्यास मदत होते. ऊसाची जलधारणा शक्ती वाढते. हवा आणि पाण्याचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते. जीवाणूंचे कार्य सुलभ होते. मुळाच्या पोकळ्या मजबूत असल्याने अन्नद्रव्यांचा पुरवठा सुलभरीत्या होतो. अलीकडे राहुरी येथील विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये जमिनीचा सामू व सेंद्रिय कर्बाचे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून आले आहे. जास्त तापमानामध्ये जमिनीतून होणारे बाष्पीभवनही कमी होण्यास मदत होते.

नेमके सिलिकॉनमध्ये असते काय ?

सिलिकॉन चा यासर्व उपयोगामुळे सिलिकॉन पुरवठा करण्यासाठी पारंपारिक तसेच वनस्पतीच्या अवशेषांचा फेरवापर व रासायनिक घटकांचा वापर केला जातो. रासायनिक स्त्रोतांमध्ये कॅल्शियम सिलिकेट व मॅग्नेशियम सिलिकेट यांचा समावेश होतो. उसामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शिफारशीनुसार मध्यम खोल काळ्याजमिनीत उसाची लागण आणि खोडव्याचे अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी कॅल्शियम सिलिकेट 832 किलो प्रति हेक्‍टरी ऊस लागवडीच्या वेळेस एकदाच वापरले असता चारशे किलो प्रति हेक्‍टरी सिलिकॉन ऊसाला मिळते तसेच बगॅसऐशचा वापर केला तर सिलिकॉनउसासाठी उपलब्ध होऊ शकते.

संबंधित बातम्या :

आता नियमित कर्जदारांच्या अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर, शेतकरी संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

आठवड्याच्या शेवटी पुन्हा धाकधूक : सोयाबीनची विक्री की साठवणूक ? शेतकऱ्यांसमोर प्रश्न कायम

Rabi Season : अवकाळीने नुकसान, अगोदर पूर्वसूचना मगच मिळणार भरपाई, अशी आहे प्रक्रिया

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.