Agricultural : 2050 मध्ये शेती व्यवसायाचे काय असेल चित्र? ‘आयपीसीसी’चा धक्कादायक अहवाल

वातावरणातील बदलाचे परिणाम हा केवळ भारतीयांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीचा चिंतेचा विषय झालेला आहे. आयपीसीसी अर्थात (Impact Of Climate Change) ने वर्तवलेला अंदाज धक्कादायक आहे. आयपीसीसी एआर 6 डब्ल्यूजीआयआयएसल क्लायमेट चेंज 2022 या नावाने प्रसिद्ध केलेल्या सहाव्या मूल्यांकन अहवालात हवामान बदलाचे परिणाम येत्या काही वर्षांत काय राहतील व शेती व्यवसायाला कोणत्या बाबींचा सामना करावा लागेल याबद्दल उल्लेख केले आहे.

Agricultural : 2050 मध्ये शेती व्यवसायाचे काय असेल चित्र? 'आयपीसीसी'चा धक्कादायक अहवाल
वातावरणातील बदलामुळे 2050 मध्ये मका उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 10:54 AM

मुंबई :  (Climate change) वातावरणातील बदलाचे परिणाम हा केवळ भारतीयांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीचा चिंतेचा विषय झालेला आहे. आयपीसीसी अर्थात (Impact Of Climate Change) ने वर्तवलेला अंदाज धक्कादायक आहे. आयपीसीसी एआर 6 डब्ल्यूजीआयआयएसल क्लायमेट चेंज 2022 या नावाने प्रसिद्ध केलेल्या सहाव्या (Assessment Report) मूल्यांकन अहवालात हवामान बदलाचे परिणाम येत्या काही वर्षांत काय राहतील व शेती व्यवसायाला कोणत्या बाबींचा सामना करावा लागेल याबद्दल उल्लेख केले आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा भारतामध्ये होणार असून कारण आजही शेती व्यवसयावरच येथील लोकसंख्या ही अवलंबून आहे. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढेल, असं या अहवालात म्हटलं आहे. भारतात त्याचा मोठा परिणाम होईल. पाण्याची पातळी वाढल्याने जमीन पाण्याखाली जाणार आहे. याशिवाय किनारपट्टीच्या भागात पुराचा सामना करावा लागणार असून खारे पाणी शेतात शिरणार आहे. ज्यामुळे शेतीयोग्य जमीन खराब होईल. यामुळे मका आणि इतर पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे.

आर्थिक नुकसानीचाही करावा लागणार सामना

आयपीसीसी अहवालानुसार, भारतातील सुमारे 3 कोटी 50 लाख किनारपट्टीलगतच्या नागरिकांना पुराचा सामना करावा करावा लागु शकतो. जर पाण्याचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात झाले तर शतकाच्या अखेरीस 4 कोटी 50 लाख लोकांना धोका निर्माण होईल, असे सांगण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासूनचा भाग आणि नदीला येणाऱ्या पुरामुळे सर्वाधिक हानी ही भारताचीच होणार आहे. मात्र, ही प्रक्रिया अटोक्यात आली नाही आणि बर्फाची चादर स्थिर राहिली तरी भारताला थेट 2 लाख 72 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. मात्र, दिलेल्या आश्वासनानुसार उत्सर्जन कमी झाले तर 1 लाख 81 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

तापमानात होणार वाढ

वातावरणातील बदलामुळे भारताला तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. या अहवालात याला ‘बल्ब तापमान’ असं नाव देण्यात आलं आहे. अहवालातील अंदाजित आकडा 31 अंश सेल्सिअस आहे. अहवालानुसार, भारतातील अनेक भागात ओल्या बल्बचे तापमान केवळ 25 ते 30 अंश सेल्सिअस आहे.तर ती कधीही 31 अंशांची हीथर नसते. मात्र, या शतकाच्या अखेरीस अधिक उत्सर्जनामुळे पाटणा आणि लखनऊमध्ये ओल्या बल्बचे तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वातावणात अधिकचा बदल झाला तर भुवनेश्वर, चेन्नई, इंदूर आणि अहमदाबाद येथील ओल्या बल्बचे तापमानही वाढेल.

पिकांच्या उत्पादनावरही होणार परिणाम

Weather.com दिलेल्या माहितीनुसार, तापमानात तर वाढ होणारच आहे पण थंडी आणि पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. यामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट होणार आहे. तापमान असेच वाढत राहिले तर जगभरात पीक उत्पादनात घट होईल. यात सर्वाधिक नुकसान भारतालाच होणार आहे. 2050 पर्यंत तांदूळ, गहू, डाळी आणि धान्याचे उत्पादन 9 टक्क्यांनी कमी होईल. दक्षिण भारतातील मक्याचे उत्पादन 17 टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे देशभरातील अन्नधान्याचे भाव वाढून याचा परिणाम आर्थिक बाबींवर होणार आहे.

संबंधित बातम्या :

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? : पटोलेंचा अधिवेशनात सवाल

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे झाले तरी काय? कृषी मंत्र्यांचे भाकीत खरे ठरले पण विमा कंपन्यांनी नाही जुमानले..!

कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हळदीला चढणार ‘पिवळा’ रंग, नेमके धोरण काय ? वाचा सविस्तर

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.