महिलांच्या रोजगारासाठी पायलट प्रोजेक्ट; विद्युत केंद्राच्या परिसरापासून सुरुवात
बांबू लागवडीतून उत्पन्नसुद्धा मिळणार आहे. सोबतच महिलांना रोजगार मिळणार आहे. याचा पहिला पायलट प्रोजेक्ट नागपुरातील कोराडी औष्णिक केंद्रापासून सुरू होत आहे.
नागपूर : कोराडी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने काही पाऊलं उचलण्यात येत आहेत. बांबू हा प्रदूषण कमी करण्यासाठी चांगला उपाय आहे. बांबू लागवड करून ऑक्सिजनचे प्रमाण वातावरणात वाढवता येते. त्यामुळे प्रदूषण कमी होते. विद्युत केंद्राच्या परिसरात बांबूची लागवड करून वातावरण चांगलं करण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. यातून महिलांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
२६० महिलांना रोजगार
महिला बचतगटाच्या माध्यमातून औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात बांबू लागवड केली जाणार आहे. यातून महिलांसाठी रोजगार निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे. बांबू लागवड आणि त्याची देखभाल यासाठी 13 बचतगटाच्या 260 महिलांना 5 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. अशी माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
प्रदूषण थांबवण्यात मदत होणार
महाजनकोने अनेक जमिनी घेतल्या. मात्र त्या जमिनी पडिक आहेत. त्याचा उपयोग होत नाही. त्याचा उपयोग करण्यासाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला. या ठिकाणी बांबू लागवड केली जाणार आहे. यातून प्रदूषण थांबविण्यासाठी मदत होईल.
कोराडीत राबवला जाणार प्रोजेक्ट
सोबतच त्यातून उत्पन्नसुद्धा मिळणार आहे. सोबतच महिलांना रोजगार मिळणार आहे. याचा पहिला पायलट प्रोजेक्ट नागपुरातील कोराडी औष्णिक केंद्रापासून सुरू होत आहे. तो राज्यातसुद्धा राबविला जाणार आहे. अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कोराडी हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे गाव आहे. कोराडीत त्यांनी देवीचा मंदिर परिसर अतिशय सुरेख केला आहे. आता विद्युत केंद्र परिसरात बांबू लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.