सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Mahindra ची खास स्कीम, कोणत्याही वाहनावर 11,500 रुपयांचा डिस्काऊंट

आगामी फेस्टिव्ह सिजन डोळ्यासमोर ठेवून देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिव्ह ऑफर सादर केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Mahindra ची खास स्कीम, कोणत्याही वाहनावर 11,500 रुपयांचा डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 8:30 AM

मुंबई : आगामी फेस्टिव्ह सिजन डोळ्यासमोर ठेवून देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिव्ह ऑफर सादर केली आहे. या फेस्टिव्ह स्कीमद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना देशभरात वाहन खरेदीदरम्यान मोठी सूट मिळेल, तसेच इतरही अनेक फायदे मिळलीत. (Mahindra and Mahindra announced festive offer for government employee all over india)

Mahindra कंपनीने ही स्कीम ‘सरकार 2.0’ (Sarcar 2.0) या नावाने सादर केली आहे. ‘सरकार 2.0’ या स्कीमअतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन खरेदी करताना 11,500 रुपयांपर्यंतची रोख सूट मिळेल. तसेच कमी व्याजदर, सोपे मासिक हप्ते आणि इतर फायदे मिळलील. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी या स्कीमसाठी पात्र आहेत.

वाहन खरेदी करताना कर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. तसेच 7.25 टक्के व्याजदरावर वाहन खरेदी करता येईल. कंपनीने म्हटलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना इतरही अनेक फेस्टिव्ह ऑफर्स दिल्या जाणार आहेत. एक लाखामागे कमीत कमी 799 रुपयांपर्यंतचा मासिक हप्ता, आठ वर्षांपर्यंत हप्ते भरण्याची सुविधा असे अनेक लाभ मिळणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये Mahindra च्या विक्रीत 14 टक्क्यांची घट

Mahindra & Mahindra कंपनीला ऑक्टोबर महिन्यात मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या वाहन विक्रीत 14.52 टक्क्यांची घट झाली आहे. या महिन्यात केवळ 44 हजार 359 वाहनांची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महिंद्राच्या 51 हजार 896 वाहनांची विक्री झाली होती. महिंद्राच्या प्रवासी वाहनांची (Passenger Vehicles) विक्री एक टक्क्याने वाढली आहे. या महिन्यात महिंद्राच्या 18 हजार 622 Passenger Vehicles Units ची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यात 18 हजार 460 वाहनांची विक्री झाली होती.

कमर्शियल व्हेईकल्समध्ये कंपनीने 3 हजार 118 युनिट्सची विक्री केली आहे. कमर्शियल व्हेईकल्सच्या विक्रीत तब्बल 56 टक्क्यांची घट झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 7 हजार 151 कमर्शियल व्हेईकल्सची विक्री झाली होती. यादरम्यान कंपनीकडून होणारी निर्यात 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. या महिन्यात दोन हजार 21 वाहने निर्यात करण्यात आली आहेत. तर मागील वर्षी याच महिन्यात दोन हजार 703 वाहनं निर्यात करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

Mahindra Thar 2020 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

1 लिटर पेट्रोलमध्ये 95 किलोमीटर धावणार; दिवाळीत खरेदी करा ‘या’ चार बाईक

Festival Offer : दसरा, दिवाळीत Jeep Compass वर 1.5 लाखांची सूट

(Mahindra and Mahindra announced festive offer for government employee all over india)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.