एकदाच चार्ज करा अन् 150 किमी बाईक पळवा, 16 वर्षाच्या पठ्ठ्याची ‘जगात भारी’ कामगिरी

आशिष आणि अक्षय या दोन्ही भावांनी मिळून थेट बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक बाईक बनवली. आता हे दोन्ही भावंड जेव्हा त्यांनी बनवलेली बाईक रस्त्याने चालवतात तेव्हा अनेक लोक त्यांच्या गाडीकडे पाहतात.

एकदाच चार्ज करा अन् 150 किमी बाईक पळवा, 16 वर्षाच्या पठ्ठ्याची 'जगात भारी' कामगिरी
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 6:19 PM

लखनऊ : प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर आपण या जगात काहीही मिळवू शकतो. आपण स्वत:ला कामात झोकून दिलं तर आपलं सर्व स्वप्न साकार करु शकतो. फक्त जिद्द कायम असायला हवी. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील दोन भावांनी हे सिद्ध देखील करुन दाखवलं आहे. या दोन्ही भावांनी आपल्या वडिलांकडे नवी बुलेट गाडी घेऊन देण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या वडिलांनी बुलेट गाडी कोण बघणार आहे, असं म्हणत गाडी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आशिष आणि अक्षय या दोन्ही भावांनी मिळून थेट बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक बाईक बनवली. आता हे दोन्ही भावंड जेव्हा त्यांनी बनवलेली बाईक रस्त्याने चालवतात तेव्हा अनेक लोक त्यांच्या गाडीकडे पाहतात.

इलेक्ट्रिक वाहन बनवणारे हे दोन्ही भावंडं अगदी 16 आणि 21 वर्षांचे आहेत. 16 वर्षीय अक्षय हा पॉलिटेक्निकलचा विद्यार्थी आहे. तर 21 वर्षीय आशिष हा एम.ए.चं शिक्षण घेतोय. अक्षय पॉलिटेक्निकलचा विद्यार्थी असल्याने त्याने सर्व टेक्निकल कामं पाहिली. तर अक्षयने वेगवेगळ्चया ठिकाणाहून बाईक बनवण्यासाठी लागणारे सर्व पार्ट्स गोळा केले. दोन्ही भावांनी एकत्रितपणे केलेल्या कामामुळे अनेकांकडून विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंची आठवण काढण्यात येत आहे.

आशिष आणि अक्षय यांनी बनवलेल्या बाईकमध्ये काही खास गोष्टी देखील आहेत. त्यांच्या बाईकमध्ये इतके फिचर्स आहेत की एखाद्या कंपनीच्या नव्या बाईकमध्येही तितके नसतील. त्यांना बाईक तयार करण्यासाठी 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च आला. पण दोन्ही भावांचं म्हणणं आहे की, बाईक नवी असल्याने सुरुवातीला जास्त खर्च आला. यापुढे बाईक बनवायची असेल तर त्यामानाने कमीच खर्च येईल.

हे सुद्धा वाचा

बाईकच्या फिचर्सची गोष्ट करायची झाली तर अवघ्या पाच रुपयात बाईकची बॅटरी चार्ज होते. पण पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी जवळपास सात तास लागतात. पण एकदा सात तासांची चार्जिंग केल्यानंतर ही बाईक थेट 150 किमीपर्यंत धावू शकते.

एवढंच नाही तर बाईकमध्ये बॅक गियरदेखील आहे. या बाईकमध्ये पीवीसी पाईप लावण्यात आले आहेत. तसेच ही बाईक तीन जणांचं वजन पेलू शकते. बाईकमध्ये 24 एम्पियर आणि 60 किलोवॅट वोल्टेजची बॅटरी लावण्यात आली आहे. बाईकमध्ये स्पीड कमी-जास्त करण्यासाठी एक बटन देण्यात आलं आहे, त्या बटनाने गाडीचा स्पीड कमी-जास्त करता येतो.

या बाईकचा शोध लावणारे दोन्ही भाऊ हे टेक्नोलॉजीचे फॅन आहेत. आमच्याकडे डिमांड आली तर आम्ही बाईकला आणखी चांगल्या पद्धतीने बनवू शकतो, असं आशिषने सांगितलं. बाईकमध्ये जो सामान लावण्यात आलाय तो आणखी चांगल्या दर्जाचा लावता येऊ शकतो. चांगले टायर वापरता येऊ शकतात. लोक आपल्या बजेटनुसार बाईक बनवू शकतात, असंदेखील आशिषने सांगितलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.