BMW च्या दोन ढासू बाईक भारतात लाँच, लूक आणि फीचर्स पाहून प्रेमात पडाल

बीएमडब्ल्यू मोटाराडने (BMW Motorrad) भारतात अपडेटेड 2021 R 1250 GS आणि R 1250 GS अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल या दोन गाड्या लाँच केल्या आहेत.

BMW च्या दोन ढासू बाईक भारतात लाँच, लूक आणि फीचर्स पाहून प्रेमात पडाल
2021 BMW R 1250 GS, R 1250 GS Adventure
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 3:52 PM

मुंबई : बीएमडब्ल्यू मोटाराडने (BMW Motorrad) भारतात अपडेटेड 2021 R 1250 GS आणि R 1250 GS अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल या दोन गाड्या लाँच केल्या आहेत. अपडेटेड R 1250 GS ची किंमत 20.45 लाख रुपये आणि तर अपडेटेड R 1250 GS अ‍ॅडव्हेंचरची किंमत 22.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. दोन्ही बाईक्स कंप्लीटली बिल्ट-अप (CBU) यूनिट म्हणून उपलब्ध केल्या जातील. कंपनीच्या डीलरशिपवर दोन्ही बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. नवीन बाइकच्या अपडेट्समध्ये नवीन रंग तसेच अपग्रेडेड उपकरणे समाविष्ट आहेत. (2021 BMW R 1250 GS, R 1250 GS Adventure motorcycles launched in India; know price and features)

वार्षिक अपडेटसह, आता बाईक्सला स्टँडर्ड डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल, एक इको मोड आणि बीएमडब्ल्यू इंटीग्रल एबीएस प्रो सिस्टम मिळते. हे नवीन फीचर एक प्रकारची कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम आहे, जी पुढील आणि मागील दोन्ही ब्रेक एकाच वेळी लावण्यास बाईकला सक्षम करते. या बाईक सिक्स-अ‍ॅक्सिस IMU सह वेगवेगळ्या रायडिंग परिस्थितींनुसार ब्रेकिंग अ‍ॅडजस्ट करन्यास सक्षम आहेत.

बाईकची खासियत

बाईकवरील नवीन कलर ऑप्शन्समध्ये ट्रिपल ब्लॅक आणि सॉलिड व्हाइट पेंट स्कीमचा समावेश आहे. नवीन बीएमडब्ल्यू आर 1250 जीएस अ‍ॅडव्हेंचर नवीन आईस ग्रे रंगासह ट्रिपल ब्लॅक कलरमध्ये दिसेल. असे म्हटले जात आहे की, कंपनी आयकॉनिक बीएमडब्ल्यू जीएस मोटारसायकलला 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भविष्यात या बाईक्सवर ‘एडिशन 40 ईयर्स जीएस’ ब्लॅक अँड यल्लो पेंटवर्कमध्ये सादर करेल. बाईकमध्ये ब्लूटूथ-इनेबल्ड TFT कलर डिस्प्ले आणि यूएसबी चार्जिंग सॉकेट देखील मिळते. बाईकच्या रियर हायलाइटमध्ये बीक-स्टाईल फ्रंट, एसिमेट्रिक हेडलाइट डिझाइन आणि अ‍ॅडजस्टेबल विंडस्क्रीन समाविष्ट आहे. वैकल्पिकरित्या, बाईकला अ‍ॅडॉप्टिव्ह कॉर्नरिंग लाइट्स आणि अपडेटेड हिल स्टार्ट कंट्रोल प्रो सिस्टम देण्यात येईल.

बाईकमधील इतर फीचर्स

बाईक BS6 कंप्लायंट 1,254cc, ट्विन-सिलेंडर इंजिन पॉवरने सुसज्ज आहे. जे इंजिन 7,750rpm वर 136 hp पॉवर आणि 6,250rpm वर 143Nm टार्क जनरेट करते. इंजिनमध्ये बीएमडब्ल्यू शिफ्टकॅम टेक्नोलॉजीदेखील आहे. यामधील इंजिन 6-स्पीड ट्रांसमिशनसह येतं.

इतर बातम्या

मेड इन इंडिया OLA स्कूटर प्लांटमध्ये लवकरच उत्पादन सुरु, दरवर्षी 20 लाख गाड्या तयार होणार

मध्यमवर्गीय ग्राहकांना झटका, होंडाची ‘ही’ बाईक वर्षभरात तिसऱ्यांदा महागली

वाहन उद्योग रुळावर, जून महिन्यात 2.38 लाख दुचाकींसह TVS Motors ची विक्रमी विक्री

(2021 BMW R 1250 GS, R 1250 GS Adventure motorcycles launched in India; know price and features)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.