Ducati च्या दोन शानदार बाईक्स बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

डुकाटीने भारतात बीएस 6 मॉडेल असलेल्या दोन आलिशान बाईक स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट आणि स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेड लाँच केल्या आहेत.

Ducati च्या दोन शानदार बाईक्स बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Ducati Scrambler Nightshift
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 9:06 AM

मुंबई : डुकाटीने भारतात बीएस 6 मॉडेल असलेल्या दोन आलिशान बाईक स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट आणि स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेड लाँच केल्या आहेत. डुकाटी स्क्रॅम्बलर नाईटशिफ्टची (Ducati Scrambler Nightshift) किंमत 9.80 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) आहे तर डुकाटी स्क्रॅम्बलर डेझर्ट स्ले़ड (Ducati Scrambler Desert Sled) या बाईकची किंमत 10.89 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) इतकी आहे. नवीन स्क्रॅम्बलर्स आता डुकाटी डीलरशिपकडे बुक केल्या जाऊ शकतात आणि त्यांचे वितरणही (डिलीव्हरी) लवकरच सुरू होईल. (2021 Ducati Scrambler Nightshift and Scrambler Desert Sled Launched In India, check price and Features)

डुकाटी स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट (Ducati Scrambler Nightshift) आणि डुकाटी स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेडमध्ये (Ducati Scrambler Desert Sled) समान 803 सीसी, एल-ट्विन, टू-व्हॉल्व्ह इंजिन आहे जे 8,250 आरपीएम वर 73 बीएचपी पॉवर आणि 5,750 आरपीएम वर 66.2 एनएम पीक टॉर्क उत्पन्न करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सससह सुसज्ज आहे. स्क्रॅम्बलर नाइटशिफ्ट स्टील ट्रेलिस फ्रेमसह येते आणि ही बाईक सुपर टायरवाल्या स्पोक व्हिल्सने सुसज्ज आहे. स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेडमध्ये 46 मिमी फोर्क आणि 200 मिमी एक्सकर्सनसह अॅडजस्टेबल सस्पेन्शन आहे.

डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्र म्हणाले की, “आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की, सर्व दुचाकीस्वार त्यांच्या नवीन ड्रायव्हिंग कौशल्यांना आव्हान देण्यासाठी आणि स्क्रॅम्ब्लरचे मालक होण्याचे स्वप्न साध्य करण्यासाठी या नवीन मोटारसायकलला भरभरून प्रतिसाद देतील.

Ducati Scrambler Desert Sled

डुकाटीच्या नवीन बाईक्समध्ये काय आहे खास?

Scrambler Nightshift एविएटर ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात एलईडी लायटिंग आणि कॅफे रेसर शैलीची सपाट सीट आहे. नवीन डुकाटी स्क्रॅम्बलर नाइटशिफ्ट, स्क्रॅम्बलर कॅफे रेसर आणि फुल थ्रॉटल व्हेरिएंटची जागा घेईल. स्क्रॅम्बलर नाइटशिफ्ट डुकाटीच्या दोन मॉडेल्सचा कॉम्बो आहे आणि कॅफे रेसर स्टाईल सीट, रुंद अ‍ॅल्युमिनियम हँडलबारला सपोर्ट करते. या बाईकचे मागील मड-गार्ड काढून टाकण्यात आलं आहे.

डुकाटी स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेड, स्क्रॅम्बलर नाइटशिफ्टसारखीच आहे परंतु नवीन रंगात ती सादर केली आहे. नवीन स्पार्कलिंग ब्लू कलरची दुचाकी इंधन टाकी आणि मडगार्डवरील लाल-पांढर्‍या डिटेल्ससह लायव्हरी डेजर्ट स्लेड ग्राहकांना नव्याने आकर्षित करते. बीएस 6 डेझर्ट स्लेडमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. ही बाईक 19 इंचांचे फ्रंट व्हील आणि 17 इंचांचे रियर स्पोक व्हील कॉम्बोवर पिरेली स्कॉर्पियन रॅली एसटीआर टायरसह येते.

बुकिंग सुरु

स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट आणि स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेड दोन्ही बाईक सारख्याच इंजिनासह सादर करण्यात आल्या असून 6-स्पीड गिअरबॉक्ससह येतात. दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, कोची, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सर्व डुकाटी डिलरशिप्सकडे नवीन स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट आणि स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेडसाठी बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. लवकरच या मोटारसायकलींचे वितरण सुरु होणे अपेक्षित आहे.

इतर बातम्या

7 रुपयात 100 KM प्रवास करा, ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन, लायसन्सची गरज नाही

(2021 Ducati Scrambler Nightshift and Scrambler Desert Sled Launched In India, check price and Features)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.