टाटा नेक्सॉनहूनही महाग असलेली ‘ही’ सुपरबाईक भारतात लाँच, 28 जानेवारीपासून डिलीव्हरी सुरु होणार

सुपरबाईक बनवणारी इटालियन कंपनी डुकाटीने शुक्रवारी भारतात स्टेज-6 स्क्रॅम्बलर (2021 Ducati Scrambler) रेंज सादर केली आहे.

टाटा नेक्सॉनहूनही महाग असलेली 'ही' सुपरबाईक भारतात लाँच, 28 जानेवारीपासून डिलीव्हरी सुरु होणार
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 9:44 PM

मुंबई : सुपरबाईक बनवणारी इटालियन कंपनी डुकाटीने शुक्रवारी भारतात स्टेज-6 स्क्रॅम्बलर (2021 Ducati Scrambler) रेंज सादर केली आहे. या सुपरबाईकची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरु होते. म्हणजेच या बाईकची किंमत टाटाची शानदार SUV Tata Nexon (सुरुवातीची किंमत 6.99 लाख रुपये) पेक्षाही जास्त आहे. डुकाटी इंडियाने (Ducati India) जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, 2021 मध्ये कंपनी स्क्रॅम्बलर रेंजमध्ये आता स्क्रॅम्बलर आयकॉन (Ducati Scrambler Icon), आयकॉन डार्क (Ducati Scrambler Icon Dark) आणि 1100 डार्क प्रोचाही (Ducati Scrambler Icon Dark 1100 Pro) समावेश करण्यात आला आहे. या गाड्यांच्या किंमती (एक्स शोरूम) क्रमशः 8.49 लाख रुपये, 7.99 लाख रुपये, आणि 10.99 लाख रुपये इतकी आहे. (2021 Ducati Scrambler Range Launched In India Prices Start At 7.99 Lakh)

डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विपुल चंद्र म्हणाले की, स्क्रॅम्बलर रेंज सुरुवातीपासूनच ग्राहकांची सर्वात फेव्हरेट आहे, सुरुवातीपासूनच ही बाईक भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या सुपरबाईकपैकी एक बनली आहे. कंपनी सुरुवातीला भारतात स्क्रॅम्बलर 1100 प्रो आणि 1100 स्पोर्ट प्रो ची विक्री सुरु करणार आहे. कंपनीने म्हटलं आहे की, नवीन रेंजसाठी दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरु, कोची, कोलकाता आणि चेन्नईत सर्व डुकाटी डीलरशिपमध्ये बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. 28 जानेवारीपासून या बाईकची डिलीव्हरी सुरु केली जाणार आहे.

803 सीसी एल-ट्विन इंजिन

2021 डुकाटी स्क्रॅम्बलर आयकॉन आणि स्क्रॅम्बलर आयकॉन डार्कमध्ये बीएस 6 कम्प्लिट 803 सीसी एल-ट्विन इंजिन देण्यात आलं आहे. जे 8,250 आरपीएम वर 71 बीएचपी आणि 57,775 आरपीएम वर 66.2 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. बीएस 6 कंप्लिट इंजिन आणि कलर अपडेटसह या मोटारसायलमध्ये नवीन सस्पेन्शन सेटअप आणि कॉर्नरिंग एबीएस देण्यात आलं आहे. या मोटरसायकलमध्ये एक ऑप्शनल डुकाटी मल्टीमीडिया सिस्टिमही देण्यात आली आहे, ज्याद्वारे चालकाला गाणी ऐकण्याची, कॉल रिसिव्ह करण्याची सुविधा मिळते.

यावर्षी 12 नव्या सुपरबाईक लाँच होणार

दरम्यान डुकाटी इंडियाने (Ducati India) घोषणा केली आहे की, कंपनी 2021 मध्ये 12 नवीन मोटरसायकल सादर करणार आहे. ज्यामध्ये सर्व नवीन मॉडल्स असतील. सर्व मॉडल्स बीएस 6 स्टँडर्ड इंजिनासह लाँच करण्यात येतील. 2021 साठी डुकाटी इंडिया प्रोडक्ट रेंजमध्ये मॉन्स्टर (Ducati Monster), स्क्रॅम्बलर (Ducati Scrambler), मल्टीस्ट्राडा (Ducati Multistrada), Ducati Panigale, Ducati Diavel आणि मोस्ट अवेटेड स्ट्रीटफायटर (Ducati Streetfighter) फॅमिलीमधील गाड्या लाँच करणार आहे.

या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये मल्टीस्ट्राडा V4, स्ट्रीटफायटर V4 आणि MY2021 Panigale V4 सहित V4 इंजिन प्लॅटफॉर्मवर आधारित सर्व नवीन मोटरसायकल लाँच केल्या जातील. तर वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये सर्व नवीन डुकाटी मॉन्स्टर लाँच केल्या जातील. त्यानंतर सुपरस्पोर्ट 950 आणि हायपरमोटर्ड 950 लाँच होतील.

हेही वाचा

बुलेटप्रेमींसाठी मोठी बातमी, किमती बदलल्या, बुलेट स्वस्त की महाग?

KTM आणि Husqvarna ने मोटारसायकल्सच्या किंमती वाढवल्या, जाणून घ्या कोणत्या बाईक महागल्या?

भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या KTM च्या ‘या’ बाईकचं पुढील व्हर्जन लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(2021 Ducati Scrambler Range Launched In India Prices Start At 7.99 Lakh)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.