जोरदार पावसात, डोंगरदऱ्यात भटकंतीसाठी Harley Davidson ची दमदार बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स
हार्ले डेव्हिडसन इंडियाने (Harley-Davidson India) पॅन अमेरिका 1250 अॅडव्हेंचर (Pan America 1250 ADV) मोटारसायकल लाँच केली आहे.
मुंबई : हार्ले डेव्हिडसन इंडियाने (Harley-Davidson India) बहुप्रतीक्षित पॅन अमेरिका 1250 अॅडव्हेंचर (Pan America 1250 ADV) मोटारसायकल 16,90,000 रुपयांमध्ये लाँच केली आहे. या बाईकच्या बेस ट्रिमची किंमत 16,90,000 रुपये आहे, तर हाय एंड स्पेक ट्रीम असलेल्या अमेरिका 1250 ची किंमत 19,99,000 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम इंडिया आहेत. नवीन पॅन अमेरिका 1250 च्या दोन्ही व्हेरिएंट्सना त्यांच्या उपकरण आणि फीचर्स लिस्टनुसार डिव्हाईड केलं जाईल. (2021 Harley Davidson Pan America 1250 ADV Bike launched in India)
आपण जर या दोन्ही बाईक्सच्या स्टँडर्ड व्हेरिएंट्सविषयी चर्चा केली तर त्यात फुल-एलईडी लायटिंग, ब्लूटूथ-एनेबल्ड 6.8 इंचाचा कलर टीएफटी टचस्क्रीन डिस्प्ले आणि यूएसबी सी-टाइप आउटलेटचा समावेश आहे. त्याच वेळी, टॉप आणि पॅन अमेरिका 1250 स्पेशलमध्ये एक अतिरिक्त किट प्रदान केले जाईल, जे प्रीमियम इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबल सेमी अॅक्टिव्ह सस्पेंशन सेटअप, सेंटर स्टँड, हीटेड ग्रिप्स, टायर मॉनिटरिंग सिस्टम, स्टीयरिंग जम्पर आणि इंडस्ट्री फर्स्ट अडॅप्टिव्ह राईड हाईटसह येईल.
फीचर्स
स्टँडर्ड ट्रिम निवडण्यासाठी पाच रायडिंग मोड देण्यात आले आहेत. त्याच वेळी, आपल्याला चार प्री प्रोग्राम्ड मोड्स मिळतील (रोड, स्पोर्ट, रेन, ऑफ-रोड आणि ऑफ-रोड प्लस) आणि एक कस्टम मोड आहे. रायडरच्या निवडीनुसार ते सेट करता येतील. त्याच वेळी, स्पेशल ट्रिमला 2 अतिरिक्त मोड मिळतात जे कस्टमायजेबल आहेत.
दमदार इंजिन
या बाईकच्या मेकॅनिकल बाबींबाबत बोलायचे झाल्यास दोन्ही बाईक्समध्ये सेम पॉवर देण्यात आली आहे. यात 1252cc रिवॉल्यूशन मॅक्स 1250 इंजिन आहे, जे 9000rpm वर 150bhp पॉवर आणि 6750rpm वर 127Nm टॉर्क जनरेट करतं. ट्रान्समिशन ऑप्शन्समध्ये तुम्हाला 6 स्पीड युनिट मिळेल.
BMW आणि Ducati च्या बाईक्सना टक्कर
या दुचाकीच्या काही प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये BMW R 1250 GS आणि भारतीय बाजारात आगामी Ducati Multistrada V4 चा समावेश आहे. गेल्या काही काळात भारतात हार्ले डेव्हिडसनचं प्रदर्शन फारसं चांगलं राहीलेलं नाही. अशातच कंपनी आता पूर्णपणे त्यांच्या उत्पादनावर फोकस करत आहे. भारतात या सेगमेंटमधील बाईक्सना फारसा चांगला प्रतिसात मिळत नाही. कारण या बाईक्स खूप जास्त महाग आहेत. तरीदेखील कंपनी भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळ्या रणनीती तयार करुन आपल्या बाईक्स विकणार आहे. कंपनीने त्यासाठी काही योजना तयार केल्या आहेत.
इतर बातम्या
रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला Jawa कंपनीकडून 1.75 लाखांची बाईक गिफ्ट
पॉवरफुल इंजिन, ढासू फीचर्ससह Bajaj Pulsar NS 125 बाजारात, किंमत…
(2021 Harley Davidson Pan America 1250 ADV Bike launched in India)