2021 Skoda Octavia लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या का खरेदी करावी ही कार?
Skoda Auto India ने यावर्षी मोठ्या लाँचिंगची योजना आखली आहे. नवीन ऑक्टव्हिया सेडान (2021 Skoda Octavia) त्यापैकीच एक आहे.

मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) यावर्षी मोठ्या लाँचिंगची योजना आखली आहे. नवीन ऑक्टव्हिया सेडान (2021 Skoda Octavia) त्यापैकीच एक आहे. स्कोडाने अधिकृतपणे नवीन कारच्या लाँचिंगबाबतच्या तपशीलाची काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टमध्ये पुष्टी केली आहे. असं म्हटलं जात आहे की, ही कार जूनमध्ये भारतात लाँच केली जाईल. (2021 Skoda Octavia to launch soon: features to expect)
फोर्थ जनरेशन ऑक्टव्हिया सेडान नोव्हेंबर 2019 मध्ये अधिकृतपणे सादर करण्यात आली होती. आता जनरेशन बदलासह ऑक्टाव्हियाच्या इंटिरियरमध्ये अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत. पूर्णपणे सुधारित एस्टीरियर डिझाइनपासून ते नवीन केबिन, तंत्रज्ञान आणि अद्ययावत पॉवरट्रेन पर्यायांपर्यंत ऑक्टाव्हिया पूर्णपणे नवीन कार म्हणून सादर केली जाणार आहे. या कारच्या लॉन्चिंगपूर्वी त्याचे काही प्लस पॉईंट्स जाणून घ्या…
एस्टीरियर डिझाइनमध्ये बदल
नवीन ऑक्टॅव्हियाच्या एस्टीरियर हायलाइटमध्ये ब्लॅक व्हर्टिकल स्लेट्ससह नवीन बटरफ्लाय ग्रिलचा समावेश आहे. ग्रिलमध्ये ड्युअल जे-शेप्ड एलईडी डीआरएल आणि फॉग लाईट्ससह एलईडी हेडलॅम्प्स सज्ज आहेत. मागील बाजूस एलईडी टेललाईट्स मिळतात, जे सेडानचे स्पोर्टी प्रोफाइल अधिक आकर्षक करतात. बूटलीडवर स्कोडा लेटरिंग देखील आहे. इतर अनेक नवीन उत्पादनांमध्येही स्कोडाने समान लेटरिंग डिजाइन लागू केलं आहे. 2021 ऑक्टॅव्हियामध्ये 17 इंचाचे अॅलोय व्हील्स मिळतील, ज्यामुळे कारला मस्क्युलर स्टान्स मिळतो.
With the coupe like design, LED taillights and dynamic turn indicators, the all new ŠKODA OCTAVIA’s will please both the owner and the viewer alike. #AllNewSkodaOCTAVIA #4DaysToGo pic.twitter.com/9EONQwE24u
— ŠKODA AUTO India (@SkodaIndia) June 6, 2021
शानदार इन्फोटेन्मेंट सिस्टम
ऑक्टॅव्हिया 10 इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टमसह सादर केली जाईल. कारच्या इंटर्नल स्पेक्समधील हे फीचर सर्वाधिक लक्ष वेधून घेईल. इतर केबिन फीचर्समध्ये थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, शिफ्ट-बाय-वायर गियरस्टिक आणि फ्लॅट बॉटम स्पोर्टी-लुकिंग स्टीयरिंग, 10.25 इंचांचं डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळेल.
The all new ŠKODA OCTAVIA is stylish and sleek. Along with the improved aerodynamic structure that gives it a drag coefficient of 0.24, the OCTAVIA comes with Bi-LED Headlights, stylish alloy wheels, new robust front grille and much more. #AllNewSkodaOCTAVIA #5DaysToGo pic.twitter.com/8nuf7mKhJ9
— ŠKODA AUTO India (@SkodaIndia) June 5, 2021
इतर बातम्या
Hyundai Grand i10 Nios क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
Isuzu वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय
भारतात धुमाकूळ घालण्याऱ्या कारची पाकिस्तानकडून कॉपी, चिनी कंपनीकडून विक्री
(2021 Skoda Octavia to launch soon: features to expect)