दमदार इंजिन, जबरदस्त फीचर्ससह 2021 Triumph Bonneville Street Twin भारतात लाँच

Triumph Motorcycles कंपनीने भारतात 2021 Triumph Bonneville Street Twin लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत 7.95 लाख रुपये इतकी आहे.

दमदार इंजिन, जबरदस्त फीचर्ससह 2021 Triumph Bonneville Street Twin भारतात लाँच
2021 Triumph Bonneville Street Twin
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 6:49 PM

मुंबई : Triumph Motorcycles कंपनीने भारतात 2021 Triumph Bonneville Street Twin लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची एक्स-शोरूम किंमत भारतीय बाजारात 7.95 लाख रुपये इतकी ठेवली आहे. या बाईकचं नवीन मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा 50 हजार रुपयांनी महाग झाले आहे. कंपनीने आपल्या नवीन मोटरसायकलच्या स्टाईलमध्ये काही छोटे बदल केले आहेत. यात नवीन साइड पॅनेल्स, अपडेटेड डिकेल्स, फॉइल टँक बॅजेस, ब्रश्ड अ‍ॅल्युमिनियम हेडलाईट ब्रॅकेट्स, मशीन्ड स्पोक डिटेलिंग आणि रीडिजाइन्ड फ्लॅट सीट देण्यात आली आहे. (2021 Triumph Bonneville Street Twin Launched in India)

2021 Triumph Street Twin मध्ये स्टायलिंग व्यतिरिक्त आणखी बरेच अपडेट्स करण्यात आले आहेत. यात बीएस 6 कम्प्लायंट इंजिन आहे. ही बाईक पूर्वीपेक्षा अधिक इंधन कार्यक्षम बनली आहे. म्हणजेच ग्राहकांना पूर्वीपेक्षा आणखी मायलेज मिळेल.

2021 Triumph Bonneville Street Twin च्या पॉवर परफॉरमन्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कोणतेही यांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत. पॉवरसाठी 900 सीसी, पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आलं आहे. या बाईकचं इंजिन 7,500 आरपीएम वर 64 बीएचपीची मॅक्सिमम पॉवर आणि 3,800 आरपीएमवर 80 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह इंजिन वेट, मल्टी-प्लेट टॉर्क असिस्ट कल्चसह सुसज्ज आहे.

डिझाईन

2021 Triumph Bonneville Street Twin च्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास, या बाईकची रुंदी 780 मिलीमीटर आणि उंची 1110 मिलीमीटर इतकी आहे. बाईकच्या सीटची उंची 765 मिलीमीटर इतकी आहे. त्याच वेळी, बाईकचा व्हीलबेस 1450 मिलीमीटर इतका आहे. बाईकचं कर्ब वेट 216 किलो आहे. यात 12 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे.

फीचर्स

2021 Street Twin च्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि रीयरमध्ये मोनोशॉक अब्जॉर्बर सस्पेंशन दिलं आहे. पुढच्या आणि मागील दोन्ही बाजूला सिंगल डिस्क ब्रेक आहेत. यात समोरील बाजूस 17 इंचांचं चाक आणि मागील बाजूस 18 इंचांचं चाक आहे. नवीन Street Twin मध्ये उत्तम रायडिगं अनुभवासाठी दोन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. याशिवाय यात LED रियर लाइट, ABS आणि स्विचेबल ट्रेक्शन कंट्रोल देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

KTM ची वजनाने हलकी आणि दमदार ‘सुपर डुपर’ बाईक सादर

अवघ्या 69 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger Cruise 220

Royal Enfield । रॉयल एनफिल्डची बाजारात धूम, विक्रीत जबरदस्त वाढ, या बाईकला आहे जास्त मागणी

(2021 Triumph Bonneville Street Twin Launched in India)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.