Yamaha च्या दोन शानदार स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

यामाहा मोटर इंडियाने (Yamaha Motor India) नवीन RayZR 125 Fi हायब्रिड आणि स्ट्रीट रॅली 125 Fi हायब्रिड स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे.

Yamaha च्या दोन शानदार स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 7:40 PM

मुंबई : यामाहा मोटर इंडियाने (Yamaha Motor India) नवीन RayZR 125 Fi हायब्रिड आणि स्ट्रीट रॅली 125 Fi हायब्रिड स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. या स्कूटर्सची किंमत 76,830 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. दोन्ही स्कूटर एकाच एअर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड (Fi), 125 सीसी ब्लू कोर इंजिनमधून पॉवर घेतात. जे 6,500 आरपीएमवर 8.2 पीएस आणि 5,000 आरपीएमवर 10.3 एनएम टॉर्क निर्माण करते. (2021 Yamaha RayZR 125 Fi Hybrid, Street Rally 125 Fi Hybrid launched in India, check price, features)

दोन्ही नवीन यामाहा स्कूटरला हायब्रीड सिस्टीमच्या अतिरिक्त कार्य क्षमतेसह स्मार्ट मोटर जनरेटर (SMG) प्रणाली मिळते. कंपनीचा असा दावा आहे की, जेव्हा त्यांची स्कूटर स्टॉपवरून एक्‍लरेट केली जाते आणि तीन सेकंदांनंतर पॉवर असिस्ट फंक्शन रद्द केले जाते तेव्हा त्याची स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) प्रणाली पॉवर असिस्ट देऊन काम सुरु करते. पॉवर असिस्ट (हायब्रिड सिस्टीम) काम करत असताना मीटर कन्सोलवर एक अलर्ट इंडिकेशन देखील असते.

यामाहाच्या नवीन मोटरसायकलची वैशिष्ट्ये

यामाहा स्कूटरच्या वैशिष्ट्यांमध्ये इंजिन स्टार्ट सिस्टम, ऑटोमॅटिक स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम, एलईडी लाइटिंग, युनिफाइड ब्रेक सिस्टीम (यूबीएस), साइड स्टँड इंजिन कट ऑफ स्विच आणि यामाहा मोटरसायकल कनेक्ट एक्स एपीपीसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे.

जपानी दुचाकी निर्मात्या कंपनीचा दावा आहे की, स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) तंत्रज्ञान ऑटो इंजन स्टार्ट / स्टॉपमध्ये मदत करते, तसेच स्टॉपवरुन ​​​​एक्सीलरेट करत तीन सेकंदासाठी पॉवर असिस्ट इनेबल करते. 2021 Yamaha RayZR 125 Hybrid डिस्क ब्रेक व्हेरिएंटमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी पोझिशन लॅम्प, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि यामाहा मोटर कनेक्ट एक्स (Yamaha Motor Connect X) अॅप्लिकेशन सारखी वैशिष्ट्ये आहेत. डिस्क व्हेरियंटला साइड स्टँड इंजिन कट-ऑफ देखील मिळते. लेटेस्ट अपडेटसह स्कूटरचे एकूण वजन 99kgs (kerb) इतके आहे.

इतर बातम्या

Tesla लवकरच स्वस्तातली इलेक्ट्रिक कार लाँच करणार, फीचर्सही दमदार

Hyundai च्या गाड्यांवर 1.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, यादीत सँट्रो, i10 Nios चा समावेश

Kia Seltos आणि Sonet च्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नव्या किंमती

(2021 Yamaha RayZR 125 Fi Hybrid, Street Rally 125 Fi Hybrid launched in India, check price, features)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.