2022 KTM 390 Adventure लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि बाईकची खासियत

KTM ने अपडेटेड 2022 KTM 390 Adventure सादर केली आहे. या मेड-इन-इंडिया 390 अॅडव्हेंचरच्या लेटेस्ट व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रॉनिक अपडेट्स तसेच कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.

2022 KTM 390 Adventure लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि बाईकची खासियत
2022 Ktm 390 Adventure
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 1:43 PM

मुंबई : KTM ने अपडेटेड 2022 KTM 390 Adventure सादर केली आहे. या मेड-इन-इंडिया 390 अॅडव्हेंचरच्या लेटेस्ट व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रॉनिक अपडेट्स तसेच कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जानेवारी 2022 मध्ये ही मोटारसायकल जागतिक बाजारात लाँच होईल आणि परदेशातील डीलरशीपला टक्कर देईल, त्यानंतर ती भारतात लॉन्च होईल. नवीन-जनरल अॅडव्हेंचर टूररला आवश्यक फीचर अपग्रेड प्राप्त झाले आहेत. (2022 KTM 390 Adventure ready to launch in global market with ne updates)

व्हिजुअली 2022 KTM 390 Adventure मध्ये बाईकला नवीन अपील देण्यासाठी नवीन ग्राफिक्ससह दोन नवीन रंग पर्याय मिळतील. पण महत्त्वाचे म्हणजे, KTM ने 390 Adventure च्या 2022 मॉडेलचे इलेक्ट्रॉनिक्स दोन वेगवेगळ्या लेव्हल्सचे ट्रॅक्शन कंट्रोल देऊन अपडेट केले आहे. जे रस्त्यावर आणि ऑफ-रोड दोन्ही मोड ऑफर करतात.

रायडर्सना अधिक चांगला कंट्रोल मिळणार

नवीन ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स ऑफ-रोड मोडमध्ये व्हील स्लिप करण्यास परवानगी देण्यासाठी ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम अॅडजस्ट करतील, रायडरला अवघड रस्त्यांवर बाईकवर कंट्रोल ठेवण्यास त्याची मदत होईल. ऑफ-रोड ट्रॅक्शन कंट्रोल मोड नवशिक्या ऑफ-रोड रायडर्सना हाय-रेव्हिंग इंजिनची सवय होण्यास आणि रियर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतो.

इंजिन बंद पडल्यानंतरही ही सिस्टिम मेंटेन करता येईल. सध्याच्या ट्रॅक्शन कंट्रोल सेटिंग्सचा उपयोग बाईक घसरत असताना किंवा ऑफ-रोड रायडिंग करताना इंजिन थांबवून डिफॉल्ट सेटिंग्समध्ये परत जाण्यासाठी केला जाऊ शकतो.

कास्ट अलॉय व्हीलमध्ये सुधारणा

कास्ट अलॉय व्हील्समध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. KTM च्या मते, नवीन अलॉय व्हील अधिक मजबूत आहेत आणि अधिक रेसिस्टेंस ऑफर करतात. ज्यामुळे ही बाईक खडबडीत प्रदेशात, खडकाळ रस्त्यांवर चांगला रायडिंग एक्सपीरियन्स प्रदान करते. सध्याच्या KTM 390 Adventure च्या 12 स्पोक डिझाइनऐवजी अलॉय व्हील डिझाइनमध्ये आता 10 स्पोक डिझाइन वापरण्यात आले आहे.

या बाईकच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत, यामध्ये जुनेच 373 cc इंजिन देण्यात आले आहे, जे 9,000 rpm वर 43 bhp पॉवर आणि 7,000 rpm वर 37 Nm पीक टॉर्क जनरेट करते. सध्याच्या KTM 390 Adventure ची किंमत 3.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवी बाईक यापेक्षा थोडी महाक असू शकते.

इतर बातम्या

Bharat Vehicle Series: अशी करा मार्क BH मालिकेसाठी नवीन नोंदणी, 15 राज्यांमध्ये सेवा सुरू

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(2022 KTM 390 Adventure ready to launch in global market with ne updates)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.