काऊंटडाऊन सुरु! नव्या बदलांसह All new Tata Safari लाँच होण्यासाठी सज्ज

नव्या बदलांसह भारतीयांची लाडकी कार ऑल-न्यू Tata Safari उद्या (26 जानेवारी) भारतात लाँच केली जाणार आहे.

काऊंटडाऊन सुरु! नव्या बदलांसह All new Tata Safari लाँच होण्यासाठी सज्ज
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 6:52 PM

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी उद्या (26 जानेवारी) त्यांची ऑल-न्यू सफारी (All new Tata safari) ही कार लाँच करणार आहे. कंपनीने ही कार लाँच करण्यासाठीची तयारी पूर्ण केली असून आता सर्वांना केवळ लाँचिंगची प्रतीक्षा आहे. कंपनीने नुकताच या कारच्या प्रोडक्शन मॉडेलवरुन पडदा हटवला होता. आता सर्वांना केवळ लाँचिंगची प्रतीक्षा आहे. सुरुवातीला या SUV चं नाव Gravitas असं ठेवण्यात आलं होतं. परंतु ही कार ऑल न्यू टाटा सफारी या नावाने सादर केली जाणार आहे. सर्वात आधी ही कार 2020 Auto Expo मध्ये सादर करण्यात आली होती. Tata ची ही फ्लॅगशिप SUV असेल आणि ही 7-सीटर कार असेल. (all-new Tata Safari to be launched in India on republic day 2020)

नवीन टाटा सफारी एसयूव्ही OMEGARC (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture) प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच या गाडीचं बुकिंगही सुरु होणार आहे. टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय. टाटा मोटर्सने म्हटलं आहे, “भविष्यात नव्या Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जनही येऊ शकतं. या गाडीला त्याला साजेसं डिझाईन साकारण्यात आलं आहे.

नवीन टाटा सफारीमध्ये खास बदल

=>> या एसयूव्हीमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जसे की, प्रोडक्शन व्हर्जनमध्ये मोठे हनीकॉम्ब पॉटर आणि क्रोम हायलाईटसह एलईडी प्रोजेक्टर लाईट दिली जात आहे. =>> नवीन सफारीच्या इंजिन आणि डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक दमदार फिचर्ससह बनवली जात आहे. =>> या कारमध्ये सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, 3-स्पोक स्टियरिंग व्हील, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रिकग्नायजेशन, 7-इंचांचा इंस्ट्रूमेंट पॅनल, प्रीमियम ओक मिळू शकतो. =>> या कारमध्ये तपकिरी रंगांची लेदर सीट आणि जेबीएलचे स्पीकर्स दिले जातील. =>> 2021 टाटा सफारी एसयूव्ही बीएस 6-कंप्लिट फिएट-सोर्सड 2.0-लीटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे ऑपरेट होईल, जे 5-सीटर हॅरियर एसयूव्हीला पॉवर देतं. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेलं असेल. =>> या गाडीमध्ये तुम्हाला एक्सटिरियर पेंट ऑप्शन आणि नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात. =>> नव्या अवतारातील एसयूव्हीमध्ये ग्राहकांना प्रवासाचा जबरदस्त अनुभव मिळेल. या कारचं डिझाईन, परफॉर्मन्स, मल्टी टास्किंग आणि अनेक प्रकारच्या सर्विसेसमुळे ही कार अधिक दमदार बनली आहे.

टाटा सफारी लाँचिंगसाठी सज्ज

ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. टाटा मोटर्सचे हेड शैलेश चंद्र त्यांच्या आगामी एसयूव्हीच्या ऑपचारिक ब्रँडिंगची घोषणा करताना म्हणाले होते की, “आम्हाला पुन्हा एकदा आमची एसयूव्ही-सफारी सादर करण्याची तयारी करत असताना खूप अभिमान वाटतोय आणि तितकाच आनंदही होत आहे.

शैलेश चंद्र म्हणाले होते की, सफारी एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड आहे. देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या कारला पसंती दिली आहे. या कारचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. या कारची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवते. आता आम्हाला या कारच्या लाँचिंगची प्रतीक्षा आहे.”

हेही वाचा

नवीन Tata Safari चे फोटोज लीक, लाडक्या एसयूव्हीचा फर्स्ट लुक पाहा

Renault गाड्यांवर 65 हजारांपर्यंत सूट; ट्रायबर, क्विड आणि डस्टरचा समावेश

भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या ‘या’ छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ

टाटाच्या नव्या Safari चा फर्स्ट लूक, काय आहेत फीचर्स?

(all-new Tata Safari to be launched in India on republic day 2020)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.