कारनंतर आता बाईकप्रेमींना झटका, नवीन वर्षात Bajaj Auto कडून वाहनांच्या किंमतीत वाढ

बजाज ऑटोने बाइकच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, येत्या दोन दिवसांत दर किती वाढवायचे याचा निर्णय घेतला जाईल. याआधी देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपन्या मारुती आणि टाटा मोटर्सने किमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती.

कारनंतर आता बाईकप्रेमींना झटका, नवीन वर्षात Bajaj Auto कडून वाहनांच्या किंमतीत वाढ
Bajaj Bikes
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 2:54 PM

Bajaj Auto Price Increase : बजाज ऑटोने बाइकच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, येत्या दोन दिवसांत दर किती वाढवायचे याचा निर्णय घेतला जाईल. याआधी देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपन्या मारुती आणि टाटा मोटर्सने किमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. खर्च वाढल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. (Bajaj Auto Going to Increase price of their Bikes in next 2 days)

डिसेंबर 2021 मध्ये बजाज ऑटोची विक्री 3 टक्क्यांनी घसरून 362,470 युनिट्सवर आली. एक वर्षापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये कंपनीची विक्री 3,72,532 युनिट्स इतकी होती. तर, नोव्हेंबर 2021 मध्ये 3,79,276 युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली होती.

शेअर बाजारात पुन्हा उसळण

बजाजकडून किमतीत वाढ झाल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारात पुन्हा उसळी घेतली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. NSE वर स्टॉक 26 रुपयांनी वाढून 3277 रुपयांवर पोहोचला आहे.

Hero MotoCorp च्या बाईक्सना ग्राहकांची पसंती

2021 मध्ये Hero MotoCorp च्या मोटरसायकलची एकूण विक्री 2.80 लाख युनिट्स होती. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये कंपनीचा वाढीचा दर 71 टक्क्यांहून अधिक होता. यावरून कंपनीची वाढ विदेशी बाजारपेठेत कशी होती याचा अंदाज लावता येतो.

मारुती सुझुकीच्या गाड्या महागल्या

मारुती सुझुकीने अलीकडेच स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे की, ते 1 जानेवारी 2022 पासून किमती वाढवतील. ऑटोमेकरने 2021 मध्ये आपल्या वाहनांच्या किमतीत 4.9% ने वाढ केली आहे. या कंपनीच्या वाहनांच्या किमती जानेवारीमध्ये प्रथम 1.4 टक्के, नंतर एप्रिलमध्ये 1.6 टक्के आणि शेवटी सप्टेंबरमध्ये 1.9 टक्क्यांनी वाढल्या.

मारुतीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, “गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे, कंपनीसाठी हे अत्यावश्यक बनले आहे की ग्राहकांवर अतिरिक्त खर्चाचा काही भार देऊन तोटा भरुन काढला जाईल.

टाटा मोटर्सनेही किंमती वाढवल्या

देशातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सनेही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. जानेवारी महिन्यात कंपनीच्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत बदल दिसून येतील. ही वाढ अंदाजे 2.5% इतकी आहे. ही घोषणा नुकतीच करण्यात आली असताना, टाटाने आधीच त्यांच्या फ्लॅगशिप SUV, सफारीच्या किमती ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 7,000 रुपयांनी वाढवल्या होत्या.

टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल्स बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले, “कच्च्या मालाच्या किमती आणि इतर इनपुट कॉस्ट वाढतच आहेत. वाढत्या किंमतीच्या परिणामावर मात करण्यासाठी कंपनीला जानेवारी 2022 पासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणे भाग पडले आहे.

इतर बातम्या

Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत

(Bajaj Auto Going to Increase price of their Bikes in next 2 days)

बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...