CNG Bike : एक रुपयात 1 किमी धावणार; टाकी फुल केल्यावर या बाईकने 330 किमीचा गाठा टप्पा

CNG Bike : या बाईकने देशाचेच नाही तर जगाचे लक्ष वेधले आहे. पेट्रोलच्या किंमती गेल्या काही वर्षात 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलला पर्याय शोधण्यात येत आहे. त्यातच या नवीन बाईकची चर्चा रंगली आहे. एका रुपयांत ही बाईक 1 किमी धावणार आहे.

CNG Bike : एक रुपयात 1 किमी धावणार; टाकी फुल केल्यावर या बाईकने 330 किमीचा गाठा टप्पा
बजाज फ्रीडम 125 सीएनजी
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 2:31 PM

बजाज कंपनीने नुकतीच सीएनजी बाईक लाँच केली. तिची देशभरातच नाही तर जगभरात चर्चा रंगली आहे. जगातील पहिली सीएनजी बाईक बजाज फ्रीडम 125 आहे. देशात या बाईकची विक्री सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी तिची डिलिव्हरी पण मिळत आहे. दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही दुचाकी किफायतशीर राहणार आहे. ही दुचाकी इंधनावरील खर्च कमी करणार आहे. 1 रुपयात ही बाईक 1 किलोमीटर धावेल. इतर पेट्रोल बाईकच्या तुलनेत ही दुचाकी जास्त धावेल आणि खिशावरील भार पण कमी होईल.

किंमत आणि फीचर्स काय

बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाईकची किंमत जाहीर झाली आहे. या दुचाकीची सुरुवातीची किंमत 95 हजार रुपये (एक्स शोरूम प्राईस) ते 1.10 लाख रुपये इतकी आहे. बजाजने या बाईकचे 3 मॉडेल बाजारात उतरवले आहेत. यामध्ये ड्रम एलईडी, डिस्क एलईडी आणि ड्रम ऑप्शनचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये कंपनीने ब्लूटूथ कनेक्टिविटीसह इतर काही फीचर्स देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

या बाईकमध्ये 2 लिटरची इंधन टाकी आहे. तर आसनाखाली, सीट खाली 2 किलोग्रॅमची टाकी आहे. ही टाकी पूर्ण भरल्यावर 330 किलोमीटरचे अंतर कापता येईल. त्यामुळे ग्राहकांची पैशांची मोठी बचत होईल. ग्राहकांचा इंधनावरील खर्चात मोठी कपात होईल.

इतर वैशिष्ट्ये काय

जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 मध्ये कंपनीने 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन बाईकला 9.5PS ची पॉवर आणि 9.7Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये कंपनीने 2 लिटरचे पेट्रोल फ्युएल टँक आणि 2 किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बाईक फुल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) 330 किमीपर्यंतचे अंतर कापते.

ही बाईक तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. Bajaj Freedom 125 बाईक डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक या दोन ब्रेकिंग सिस्टिमसह येते. ही बाईक एकूण 7 रंगामध्ये येईल. यामध्ये कॅरेबियन ब्लू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्यूटर ग्रे ब्लॅक, रेसिंड रेड, सायबर व्हाईट, प्यूटर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड रंगाचा यामध्ये समावेश आहे.

1 रुपयांच्या खर्चात 1km, टाकी फुल केल्यावर 330km

मुंबईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 103.44 रुपये प्रति लिटर आहे. तर 2 लिटरसाठी ग्राहकांना 206 ते 207 रुपये मोजावे लागतील. तर 1 किलो सीएनजीची किंमत 75 रुपये , 2 किलोग्रॅम सीएनजीसाठी 150 रुपये खर्च येतो. जर बजाज फ्रीडमच्या दोन्ही इंधन टाक्या फुल केल्या तर 357 रुपये खर्च येईल. कंपनीच्या दाव्यानुसार ही दुचाकी एकूण 330 किलोमीटर धावेल. म्हणजे प्रति किलोमीटर 1.07 रुपये खर्च येऊ शकतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.