अवघ्या 52 हजार रुपयांमध्ये स्पोर्ट्स लूकवाली बजाज पल्सर, जाणून घ्या काय आहे डील

भारतात स्पोर्ट्स लूक असणारी मोटारसायकल (Motorcycle) खरेदी करण्यासाठी किमान 1 लाख रुपये खर्च करावे लागतील, ज्यामध्ये तुम्ही बजाज पल्सर (Bajaj Pulsar) सारखी बाईक खरेदी करू शकता. पण, आज आम्ही तुम्हाला अशाच एका डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला 1 लाख रुपयांची बाईक जवळपास अर्ध्या किंमतीत मिळणार आहे.

अवघ्या 52 हजार रुपयांमध्ये स्पोर्ट्स लूकवाली बजाज पल्सर, जाणून घ्या काय आहे डील
Bajaj Pulsar
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 8:30 AM

मुंबई : भारतात स्पोर्ट्स लूक असणारी मोटारसायकल (Motorcycle) खरेदी करण्यासाठी किमान 1 लाख रुपये खर्च करावे लागतील, ज्यामध्ये तुम्ही बजाज पल्सर (Bajaj Pulsar) सारखी बाईक खरेदी करू शकता. पण, आज आम्ही तुम्हाला अशाच एका डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला 1 लाख रुपयांची बाईक जवळपास अर्ध्या किंमतीत मिळणार आहे. बजाज पल्सर एएस 200 (Bajaj Pulsar AS 200) असे या बाईकचे नाव आहे.

Bajaj Pulsar AS 200 सेकंड हँड कंडिशनमध्ये फक्त 52 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. सेकंड हँड बाईक अशा आहेत, की ज्यांचा वापर त्यांच्या रायडरने मर्यादित कालावधीसाठी केला आहे. ही बाईक दिल्लीच्या RTO मध्ये नोंदणीकृत आहे.

जाणून घ्या डीलबद्दल

बजाजची ही पल्सर बाईक Bikes24 नावाच्या वेबसाईटवर लिस्टेड आहे. या बाईकची माहिती त्याच वेबसाईटवरून घेण्यात आली आहे. लाल आणि काळ्या रंगात येणाऱ्या या बाईकचे हे 2015 सालातील मॉडेल आहे. ही सेकंड ओनर बाईक असून, आतापर्यंत केवळ 23 हजार किलोमीटर चालली आहे. तिच्या पुढच्या आणि मागच्या चाकांवर डिस्क ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे. ही बाईक दिल्लीच्या DL-05 RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. लिस्टेड माहितीनुसार, या बाईकला 12 महिन्यांची वॉरंटी मिळत आहे, जी काही अटींसह उपलब्ध आहे. तसेच त्यावर मनी बॅक गॅरंटी देखील आहे.

बाईकचे फीचर्स

बजाज पल्सर AS 200 मध्ये 199.5 cc इंजिन आहे, जे 23.17 PS पॉवर देते आणि 18.3 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच, ही बाईक एका लीटर पेट्रोलमध्ये 42 kmpl मायलेज देते. बाईक देखो नावाच्या वेबसाईटवरून ही माहिती घेण्यात आली आहे. बाईकचा फोटो पाहता तिची कंडिशन चांगली दिसत आहे. यासाठी कंपनीने काही चेक पॉईंट्सद्वारे अहवाल जारी केला आहे, जो वापरकर्ते सहज तपासू शकतात.

लक्षात ठेवा!

सेकंड हँड बाईक्सबद्दल बोलायचे तर, कोणतीही वापरलेली बाईक खरेदी करण्यापूर्वी, त्याबद्दल दिलेली माहिती पूर्णपणे तपासा किंवा त्याबद्दल माहिती असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडून ही माहिती तपासा. याशिवाय दुचाकीची स्थिती तपासल्याशिवाय थेट पैसे देऊ नका. तसेच, तुम्ही वापरलेल्या बाईक्सचा व्यवहार करण्यासाठी अतिघाई करू नका.

इतर बातम्या

1.58 लाखांची बजाज Bajaj Pulsar अवघ्या 50 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

बहुप्रतीक्षित Simple One Electric Scooter च्या वितरणाची तारीख ठरली, कंपनीला 30000 हून अधिक ऑर्डर्स

सिंगल चार्जमध्ये 250KM रेंज, इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या महिन्यात बाजारात

(Bajaj Pulsar is available for only 52 thousand rupees, know about this deal)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.