Electric scooters | इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल झकास बातमी, ‘ही’ कंपनी देतेय 24000 रुपयापर्यंत डिस्काऊंट

Ather Electric Scooters | बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढतेय. किफायती परफॉर्मेंस आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमती यामागे कारण आहे. इलेक्ट्रिक स्कूटर पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगली आहे. आता कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरवक डिस्काऊंट देत आहे.

Electric scooters | इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल झकास बातमी, 'ही' कंपनी देतेय 24000 रुपयापर्यंत डिस्काऊंट
ather scootersImage Credit source: ather
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 6:51 PM

Ather Electric Scooters | पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण होऊन लोक आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे स्विच करतायत. हीच बाब लक्षात घेऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आपल्या वाहनांवर घसघशीत डिस्काऊंट देत आहे. आम्ही तुमच्यासाठी एथर स्कूटरच्या डिस्काऊंटवर मिळणारी माहिती घेऊन आलोय. यात तुम्हाला Ather 450X आणि Ather 450s वर 24000 रुपयापर्यंत बेनिफिट्स मिळतील.

एथर स्कूटर्सवर डिस्काऊंट मिळवण्यासाठी तुम्हाला कुठलीही अट पूर्ण करण्याची आवश्यकता नाहीय. हे बेनेफिट्स तुम्हाला डायरेक्ट मिळतील. तुम्ही एथरची Ather 450X आणि Ather 450s स्कूटरपैकी कुठली एक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला इथे मिळणारे बेनिफिट्स आणि दुसऱ्या डिटेल्सची माहिती येथे मिळेल. त्या बद्दल जाणून घेऊया.

कशा-कशावर डिस्काऊंट मिळेल?

एथरच्या Ather 450X आणि Ather 450s स्कूटरवर तुम्हाला एकूण 24000 रुपयापर्यंत बेनिफिट्स मिळतील. यात तुम्हाला 5000 रुपयांचा इलेक्ट्रिक डिसेंबर बेनिफिट, 12000 रुपयांचा EMI इंटरेस्ट सेविंग आणि 7000 रुपयाचा बॅटरी प्रोटेक्शन बेनिफिट्स मिळेल. या सगळ्याला मिळवून एथर स्कूटर्सवर एकूण 24000 रुपयाचा फायदा होईल.

Ather 450X च स्पेसिफिकेशन

एथरच्या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.29 लाख रुपये आहे. यात तुम्हाला 6kw इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलीय. याला 3.7kwh लिथियम आयन बॅटरी पॅकसोबत जोडण्यात आलय. 26Nm टार्क जनरेट होतं. Ather 450X च्या रेंज बद्दल बोलायच झाल्यास या स्कूटरच्या सिंगल चार्जमध्ये तुम्हाला 146 किलोमीटरची रेंज मिळते. त्याशिवाय स्कूटरच्या माहितीसाठी 7 इंचाची टचस्क्रीन डॅश मिळते. यात तुम्हाला बॅटरी, स्पीड, मायलेजसह दुसरी माहिती मिळते.

Ather 450s चे स्पेसिफिकेशन

एथरच्या या स्कूटरमध्ये 2.9kwh बॅटरी देण्यात आलीय. 5.4kw मोटराशी जोडलेली आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 115 किमीची रेंज देते. एथरचा दावा आहे, की नवीन 450S फक्त 3.9 सेकंदात 0-40 किमी/तास वेग पकडू शकते. 0-80% पर्यंत चार्ज होण्यासाठी 6 तास 36 मिनिटांचा वेळ लागतो. 450S एथरच्या ग्रिड फास्ट चार्जरचा उपयोग करुनही चार्ज करता येऊ शकतं. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.29 लाख रुपये आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.