BH Series : रजिस्ट्रेशन फी हप्त्यांमध्ये भरा, राज्य सरकार त्यांच्या नियमांनुसार रोड टॅक्स आकारणार, जाणून घ्या नवे नियम

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेहमी जावं लागतं, अशा लोकांसाठी सरकारने विशेष नोंदणी व्यवस्था करण्याची योजना बनवली आहे, जेणेकरून त्यांना प्रत्येक राज्यात नोंदणी करून घेण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल.

BH Series : रजिस्ट्रेशन फी हप्त्यांमध्ये भरा, राज्य सरकार त्यांच्या नियमांनुसार रोड टॅक्स आकारणार, जाणून घ्या नवे नियम
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 9:37 PM

मुंबई : दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषतः असे लोक ज्यांना कामाच्या निमित्ताने, पुन्हा पुन्हा बदली प्रक्रियेतून जावे लागते, अशा लोकांसाठी ही बातमी खूप दिलासादायक ठरणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत आता वाहनधारक बीएच (BH) सीरिजमध्ये आपली नवीन वाहने नोंदवू शकतील. या सिरीजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नोकरीच्या संदर्भात इतर कोणत्याही राज्यात जाताना, या क्रमांकाच्या वाहन धारकांना नवीन नोंदणी क्रमांक घेण्याची गरज भासणार नाही. या व्यवस्थेअंतर्गत, बीएच सिरीज असलेली वाहने जुन्या नोंदणी क्रमांकावरूनच आपले वाहन दुसऱ्या राज्यात सहज चालवू शकतील. (BH Series : Vehicle owner can pay registration fees in installments, know detail)

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेहमी जावं लागतं, अशा लोकांसाठी सरकारने विशेष नोंदणी व्यवस्था करण्याची योजना बनवली आहे, जेणेकरून त्यांना प्रत्येक राज्यात नोंदणी करून घेण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल. नवीन वाहनांसाठी ही नवीन नोंदणी प्रणाली आहे. अशा परिस्थितीत जाणून घ्या नवीन पॉलिसी काय आहे, ज्याचे खूप कौतुक केले जात आहे. तसेच या पॉलिसीचा फायदा कोणाला होणार आहे आणि कोणते फायदे आहेत हे जाणून घ्या.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारत सीरिज (BH सीरीज) या नवीन वाहनांसाठी नवीन नोंदणी चिन्ह सादर केले. वास्तविक काही वाहनांना नोंदणीच्या वेळी भारत सीरिज म्हणजेच बीएच सीरिजचा टॅग दिला जातो आणि त्यांची नोंदणी इतर वाहनांपेक्षा वेगळी असते. ज्या वाहनांना बीएच मार्क मिळेल, त्या वाहनांना एकवेळ नोंदणी आवश्यक असते. म्हणजेच, जर वाहन मालक दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाला, तर त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही, कारण त्यांना ते आताच करावे लागेल.

नोंदणी शुल्कासाठीचे नियम

BH सिरीज घेण्यासाठी सरकारने काही विशेष नियम केले आहेत जे नोंदणी शुल्कासाठी आहेत. नियमात असे म्हटले आहे की, वाहन मालक ज्या राज्यात राहतो त्याच राज्यात नोंदणी शुल्क भरावे लागेल. जर वाहन मालकाचे घर महाराष्ट्रात असेल, त्याचे हस्तांतरण गुजरातमध्ये होतेय, तर नोंदणीचे पैसे गुजरातमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात भरावे लागतील. तथापि, BH series चा नोंदणी क्रमांक देशातील प्रत्येक राज्यात वैध असेल.

BH series च्या नियमांनुसार, वाहन मालक दोन वर्षांसाठी नोंदणी शुल्क भरू शकतो आणि उर्वरित रक्कम पुढील वर्षांमध्ये हप्त्यांमध्ये भरू शकतो. हा हप्ता 2 च्या पटीत असेल. म्हणजेच वाहन मालक 4, 6, 8 किंवा 10 वर्षांसाठी हप्ता भरू शकतो. रस्ते मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बिझनेस स्टँडर्डला सांगितले की, सुरुवातीला वाहन मालकाला 15 वर्षांसाठी नोंदणी शुल्क भरावे लागेल. या कालावधीत वाहनाचे हस्तांतरण किंवा स्थलांतर झाल्यास, राज्य सरकार प्रो-रेटा बेसिसवर नोंदणी शुल्क परत (रीइम्बर्स) करेल.

आता फक्त या लोकांनाच लाभ मिळणार

ही योजना स्वेच्छिक आधारावर सुरू केला जात आहे. प्रथम याचा लाभ फक्त संरक्षण, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र आणि राज्य सार्वजनिक उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. तसेच ज्या खासगी कंपन्यांचे 4 किंवा चारपेक्षा जास्त राज्यांत कार्यालये आहेत, त्यांनाही ही विशेष सुविधा दिली जाणार आहे. यासह बीएफ मार्क असलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचे स्वरूपदेखील इतर वाहनांपेक्षा वेगळे असेल.

आता काय नियम?

मंत्रालयाच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपले वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेले, तर त्याला 1 वर्षाच्या आत आपल्या वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागेल. पण आता असे लोक भारत सीरिजमध्ये आपले वाहन नोंदणीकृत करू शकतील. यासह, त्यांना दुसऱ्या राज्यात पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

कसा फायदा होणार?

यासह वाहन मालकास त्याच्या मूळ राज्याकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच रस्ता कर परतावा वगैरेची समस्या येणार नाही.

टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया जाणून घ्या

BH सीरिजचे नोंदणी चिन्ह असेल .. YYBh #### XX. YY म्हणजे पहिल्या नोंदणीचे वर्ष. BH भारत सीरिजसाठी कोड असेल. #### चार अंकी संख्या असेल आणि XX दोन अक्षरे असतील.

प्रवासी वाहन वापरकर्त्याला वाहनाची नोंदणी करण्यासाठी या टप्प्यांचे पालन करावे लागते.

टप्पा 1 : दुसऱ्या राज्यात नवीन नोंदणी चिन्ह मिळवण्यासाठी वाहनधारकांना पहिल्या पालक राज्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक असेल. टप्पा 2 : नवीन राज्यात प्रो-राटा तत्त्वावर रस्ता कर भरल्यावर नवीन नोंदणी चिन्ह मिळेल. टप्पा 3 : तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला मूळ राज्यात रस्ता कराच्या परताव्यासाठी अर्ज दाखल करावा लागेल. मूळ राज्यातून परतावा मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे.

10 लाखांच्या वाहनावर 8% कर

बीएच सीरिज वाहनांच्या अंतर्गत नोंदणीसाठी शुल्क देखील निश्चित केले गेलेय. अधिसूचनेनुसार, BH सीरिजमधील 10 लाख रुपयांपर्यंतच्या वाहनांना 8% मोटार वाहन कर भरावा लागेल. 10 ते 20 लाखांच्या कारवर 10 टक्के, 20 लाख रुपयांच्या वरच्या कारवर 12 टक्के कर द्यावा लागेल. जर ते डिझेल वाहन असेल तर 2% अतिरिक्त कर भरावा लागेल. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2 टक्के कर भरावा लागेल. बीएच सीरिजअंतर्गत मोटार वाहन कर 2 किंवा 4, 6, 8 वर्षासाठी आकारला जाईल.

इतर बातम्या

हॉर्नचा सूर बदलणार, भारतीय संगीत वापरलं जाणार; नितीन गडकरी यांची माहिती

कोणकोणती वाहने स्क्रॅप होणार? जाणून घ्या स्क्रॅपिंग धोरणातील निकष

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं, स्वच्छ मुंबईसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत व्हिजन-2030 ऑनलाईन सर्वेक्षण सुरु

(BH Series : Vehicle owner can pay registration fees in installments, know detail)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.