AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 1 लाखात घरी न्या Maruti ची 32 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अवघ्या 1 लाखात घरी न्या Maruti ची 32 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 4:45 PM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bring home Maruti suzuki WagonR for just 101899 rupees)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 4.93 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ही डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी WagonR कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. कारचे मायलेज आणि मेंटेनन्स खूप चांगला आहे. या कारमध्ये तुम्हाला दोन इंजिन पर्याय मिळतील. पहिला पर्याय 998 सीसी आणि दुसरा पर्याय 1197 सीसी इंजिनचा आहे. जर आपण 998 सीसी इंजिनबद्दल बोललो तर आपल्याला यात 1.0 लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन मिळते, जे 68PS पॉवर आणि 90Nm टॉर्क जनरेट करू शकते.

मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 20.52 किमीचे मायलेज देते, परंतु जेव्हा तुम्ही ते CNG मोडवर चालवाल तेव्हा तुम्हाला 32.59 चे मायलेज मिळेल. हे वाहन सध्या CARS24 वर सूचीबद्ध आहे, जिथे त्याची किंमत 1,01,899 रुपये ठेवण्यात आली आहे. हे 2008 चे मॉडेल आहे. ही कार आतापर्यंत 38,054 किलोमीटर धावली आहे. या कारची नोंदणी DL-2C RTO ची आहे.

ही कार खरेदी केल्यावर तुम्हाला 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील मिळेल. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देते. यासाठी तुम्हाला झिरो डाउनपेमेंट करावे लागेल आणि पुढील 60 महिन्यांसाठी तुम्हाला दर महिन्याला 2229 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(bring home Maruti suzuki WagonR for just 101899 rupees)

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.